October 7, 2026

सायबर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन

0

nnनाशिक : शहरnnसायबर पोलीस ठाणे , नाशिक शहर यांच्या वतीने ‘सायबर दुत’ प्रशिक्षित करण्यासाठी महाराष्ट्र दिनी दिनांक १ मे २०२३ रोजी सकाळी ०९.०० ते दुपारी ०२.०० वाजता भीष्मराज हॉल, पोलीस मुख्यालय येथे सायबर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यशाळेमध्ये नाशिक शहरातील विविध शाळा व कॉलेज मधील शिक्षक व विदयार्थी सहभागी होणार आहेत. सायबर दूत चे प्रशिक्षण घेण्यासाठी शहरातील विविध शाळा व कॉलेजस मधुन प्रत्येकी १० ते १५ विदयार्थी असे सायबर जनजागृती कार्यशाळेत एकुण ३०० शिक्षक व विदयार्थी सहभागी होणार आहेत.nnसायबर जनजागृती कार्यशाळेत सहभागी शिक्षक व विदयार्थी यांनी ‘सायबर दूत’चे कामकाज कसे करावे याबाबत सायबर तज्ञ अधिकारी व अंमलदार यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षित सायबर दूत यांना नाशिक शहरतील नागरिक, शाळा व कॉलेजेस मधील इतर विदयार्थी यांना सायबर जनजागृती करून त्यांना साक्षर करण्यासाठी लागणारे साहित्य (मटेरियल) पुरविण्यात येणार आहे. ‘सायबर दूत’ यांनी प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र व ‘सायबर दूत’ चा बॅच देण्यात येणार आहे.nnसायबर दूतचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी जनजागृतीकरीता पुढील प्रमाणे मदत करणे अपेक्षीत आहे.nnस्वतः सायबर शिक्षित होवून समाजातील इतर घटकांना सायबर साक्षर करणे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करणे.nnविविध ठिकाणी सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करुन व्याख्यान देणे.nnसायबर गुन्हयांना बळी पडलेल्या नागरीकांना, योग्य मार्गदर्शन करणे तसेच त्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी त्यांना मदत करणे.nnनागरिकांनी फसवणुक झाल्यास तात्काळ नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल (NCCRP) वरील www.cybercrime.gov.in या वेबसाईट वर व सायबर हेल्पलाईन नंबर 1930 यावर आपली तक्रार तात्काळ नोंदवावी किंवा सायबर पोलीस ठाणे येथे जावुन तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *