August 6, 2026

अखेर एडवोकेट आंबेडकर ठाकरेंचं जमलं,नाशकात जल्लोष

0

शिवसेनेबरोबर युतीच्या घोषणेनंतर वंचित आघाडीतर्फे नाशकात जल्लोषnनाशिक–शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्याची घोषणा मुंबईत झाल्यानंतर नाशिक मध्ये या निर्णयाचे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयकाराच्या घोषणा देत तसेच पेढे वाटून जल्लोष साजरा केला.n मध्यंतरी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकताच नाशिकचा दौरा केला त्यावेळी शिवसेनेची युतीबाबत आमचे अजून काही ठरलेले नाही आम्ही फक्त एकमेकांवर लाईन मारतो असे सांगितल्याने युती होते किंवा नाही याबाबत संभ्रम कायम होता.परंतु त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून या दोन्ही पक्षांमध्ये युती झाल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली व वंचित बहुजन आघाडीतर्फे एकच जल्लोष सुरू झाला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांदर्फे प्रारंभी पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले n भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याने आता महापालिकेत तसेच जिल्ह्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात हे दोन्ही पक्ष आपला दबदबा दाखवून देतील.नाशिक महापालिकेवर शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचा संयुक्त झेंडा निश्चितच फडकेल असा विश्वास आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांनी व्यक्त केला याप्रसंगी माजी नगरसेवक भागवत भाऊ आरोटे शिवसेना माजी नगरसेविका किरण ताई दराडे बाळा दराडे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे महासचिव वामनदादा गायकवाड सुनील साळवे विनोद दोंदे बजरंग शिंदे कैलास कांबळे विलास खरात नाना वाबळे उत्तम साळवे वंचित बहुजन आघाडी व शिव सेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *