इमिग्रेशनच्या बहाण्याने एकास ३४ लाखांचा गडा
nनाशिक : परदेशी असल्याचे भासवून मैत्री करत इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेतल्याचे भासवून पाउंडची रक्कम भारतीय चलनात कनव्हर्ट करण्याचा बहाणा करत नाशिकमधील व्यक्तीला ३४ लाख २५ हजारांना गंडवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीनकुमार तुकाराम भामरे (वय ५२ वर्षे, रा. साईधाम अपार्टमेंट, बी-विंग, रामेश्वरनगर, आनंदवली, गंगापूर रोड) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.nशादी कॉम या संकेतस्थळवर भामरे यांचा उषा कडकसिंग नामक प्रोफाइलधारक संपर्कात आला. संबंधिताने विविध मेल, व्हॉट्सअॅपद्वारे वारंवार संपर्क साधत मैत्री प्रस्थापित केली. त्यानंतर आरोपींनी भारतात आल्याचे भासवून इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेतल्याचे सांगितले. विश्वास संपादन करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने पाउंडची रक्कम रुपयांमध्ये कनव्हर्ट करण्यासाठी भारतीय व्यक्तीची बँक खात्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. या प्रोसिजरकरिता भामरे यांना बँक खात्यावर ३२ लाख २५ हजार ३०० रुपये इतकी रक्कम भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. वरिष्ठ निरीक्षक मगर तपास करीत आहे.
