August 10, 2026

अटट्ल घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारास जेरबंद करून ११ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस गुन्हेशाखा युनिट क्र. १ ची कामगिरी.

0

nnनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयात वाढत असलेल्या घरफोडी चोरीचे गुन्ह्याचे अनुषंगाने घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीकोनातुन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव यांनी मार्गदर्शनपर सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगानेnगुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार समांतर तपास करत होते.( दि ६ )रोजी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर येथे नेमणुकीस असलेले पोलिस शिपाई विशाल काठे यांना गुप्त माहिती मिळाली की, घरफोडी चोरी करणारा रेकॉर्ड वरील सराईत इसम हसन हमजा कुट्टी (वय ४४ वर्षे हा नवनाथ नगर, पेठरोड़ पंचवटी) येथे लपुन वास्तव्यास आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना देत त्यांच्या मार्ग दर्शनाखाली सपोनि / तोडकर, अमलदार रविंद्र बागुल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे नाझिमखान पठाण, विशाल देवरे, विशाल काठे, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, राजेश राठोड आधीच्या पथकाने नवनाथ नगर येथे सापळा लावुन पांढ-या रंगाच्या होन्डा अॅक्टीव्हा मोपेड चालू करून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना ताब्यात घेतले. सदर आरोपीस ताब्यात घेवुन गुन्हे तपासाचे कौशल्य वापरून त्यांचेकडे सखोल विचारपुस करता त्याने त्याचे साथीदारासह नाशिक शहरात ६ व नाशिक ग्रामीण हद्दीत ५ दुकानातील शटर वाकवून घरफोडीचे एकूण ११ गुन्हे केल्याची कबुली दिली.nnनाशिक शहरातील : आडगाव , पंचवटी , म्हसरूळnमुंबईनाका पोलीस , भद्रकाली पोलीस , नाशिक तालुका पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण , वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण , वाडीव-हे पोलीस ठाणे आदी पोलिस ठाण्यातnदाखल असलेल्या ११ गुन्हे उघडकीस आले आहे. सदर आरोपीकडुन एकुण १ लाख १६ हजार ०९०/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.nnयातील आरोपी नामे हसन हमजा कुटट्टी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द १४ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.nnयापूर्वी पंचवटी पोलीस ठाणे गुरनं २६७ / २०१८ मदविक ४१४, ४५७, ३८० या घरफोडीच्या गुन्हयात दोषसिध्दीnहोवुन शिक्षा लागलेली आहे. सदर आरोपी हा दारूची दुकाने, किराणा मालाची दुकाने, करडयाचे दुकाने यांची घरफोडी करून त्यातील रोख रक्कम चोरी करतो. तपासात सदर आरोपीने सोलापुर व मध्यप्रदेशातील शिंदवाडा येथेही ७ ते ८ गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे.nसदर आरोपी नामे हसन हमजा कुट्टी यास जप्त मुद्देमालासह आडगांव पोलीस स्टेशनकडील गुरनं. १२९/ २०२२ भादविक ४५४४५७, ३८० या गुन्हयाचे पुढील तपास व कारवाई कामी आडगांव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *