Homeताज्या बातम्याखा हेमंत गोडसे व युनायटेड व्ही स्टँड फाउंडेशन यांच्यासयुक्त विद्यमाने भव्य प्रदर्शन 

खा हेमंत गोडसे व युनायटेड व्ही स्टँड फाउंडेशन यांच्यासयुक्त विद्यमाने भव्य प्रदर्शन 

खा हेमंत गोडसे व युनायटेड व्ही स्टँड फाउंडेशन यांच्यासयुक्त विद्यमाने भव्य प्रदर्शन

नशिक मध्ये पहिल्यांदाच खासदार हेमंत गोडसे आणि युनायटेड व्ही फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नो योर आर्मी’ नावाचे भव्य प्रदर्शन 18 आणि 19 मार्च रोजी गोल्फ क्लब मैदान येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

 

युनायटेड व्हीं स्टँड फाउंडेशन पूर्वीपासून आर्मीशी संलग्न कार्यक्रम घेत असते. नाशिककरांना देखील दोन दिवस नो योरं आर्मी भव्य प्रदर्शन बघण्याचा आनंद घेता येणार आहे या प्रदर्शनाचे आयोजन  नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने होत असून या भव्य प्रदर्शनाला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषद घेत केले आहे.

तोफा, रणगाडे, रायफल्स, रॉकेट लॉन्चर्स, इंडियन फिल्ड गन, आर्मी अभियंता साहित्य, बोफोर्स, धनुष,105 एम एम आय एफ जी, lmg,mmg, INSAS  अजून बरेच काही साहित्य या प्रदर्शनात बघायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संरक्षण राज्य मंत्री अजय भट, सेना प्रमुख जनरल मनोज पांडे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदीसह इतर अनेक प्रतिष्ठित लष्कर नौदल हवाई दलाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत. फाउंडेशनचे अध्यक्ष सागर मटाले यांच्या पुढाकाराने हे प्रदर्शन संपन्न होणार. भारतातील लष्करातील युद्धभूमीत महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्यांना शस्त्राचे तसेच आधुनिक भूमिका बजाविणाऱ्या शस्त्रांचे भव्य  प्रदर्शन नाशकात पहिल्यांदाच होत आहे.   प्रदर्शन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत.   या भव्य प्रदर्शनाला नाशिककरांनी मोठा प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!