Homeराज्यातील बातमीराज्यातील १०८२ पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कार्यान्वित

राज्यातील १०८२ पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कार्यान्वित

मुंबई  : वृत्त

राज्यातील १०८९ पोलीस ठाण्यांपैकी १ हजार ८२ पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी नियमितपणे कॅमेरे सुरु असणे . रेकॉर्डिंग जतन करणे आदीचे ऑडिट केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
राज्यातील उर्वरित सात पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम नूतनीकरण व स्थलांतरामुळे प्रलंबित आहे. तसेच सध्या बसविलेल्या कॅमेऱ्यांमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा नाही. अर्थात याठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या कामांत विलंब झाल्यामुळे संबंधित सेवा पुरवठादारावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती दिली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!