नाशिक पुणे रोड येथील बजरंगवाडीत दोन गटांत झालेल्या हाणामारीत कोयता व बाटल्यांचा प्राणघातक हल्ल्या करण्यात आला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी स्वता फिर्यादी होत दोन्ही गटांतील आरोपींविरुद्ध नोंदवला आहे. गुन्हा
उपनिरीक्षक बाळू गिते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संकेत उर्फ दादया तोरवणे व मंगेश हिरामण जाधव यांच्यात हाणामारी झाली. जुन्या वादाच्या कारणातुन हे वाद झाले. बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करून डोक्यात काचेची बाटली मारून तसेच विशाल जाधव यास कोयत्याने मारहाण करून जिवे मारण्याचा ठार प्रयत्न करण्यात आला.
याप्रकरणी संकेत उर्फ दादया तोरवणे, चेतम गोपाळ जाधव, अभिशेख उर्फ आबू जाधव, अभिषेक उर्फ गोटी ब्राह्मणे, अश्विन सुदाम गवळी, सागर पवार, रोहित ज्ञानेश्वर बोरस, रोहन उर्फ मोनू रामप्रसाद शर्मा, भगवान देवराम लिलके, प्रसाद उर्फ परश्या पवार, टग्या मोरे, प्रकाश रमेश शिंगाडे, पवन विष्णू खाने, ए. के (पूर्ण नाव माहीत नाही), मंगेश हिरामन जाधव, विशाल सोमनाथ गारा, राहुल भिमराव जाधव, विशाल भिमराव जाधव, सरोज शेरू शेख, रवी सोमनाथ गारा, कुणाल दौलत भांडण जाधव, करण दौलत जाधव, प्रकाश श्रीराम सोमवंशी, रूपेश मधुकर पिठे, योगेश पांडुरंग जाधव, लखन पंडीत ठाकरे, निवृत्ती हरिभाऊ जाधव यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत. हया घटना मुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.