पत्नी व मुलावर धारदार हत्याराने वार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आल्यानंतर काही वेळातच मारे करायचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील सिडको अश्विननगर परिसरात घडली आहे. या हल्ल्यात पत्नी व मुलगा जखमी झाले आहेत. या प्रकरणी मुलगा देव कौशिक याने आपल्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उद्योजक वडीलांचा मृत्यू झाल्याने हा मृत्यू कशायाने झाला. याचा पोलिस तपास करीत आहेत. मृत
आशिष जगदीश कौशिक (वय ५७) हे पत्नी ज्योती व मुलगा देवसह अश्विननगरमध्ये राहतात. देव (वय १९) हा त्याच्या खोलीत झोपलेला असताना. त्याच्या उजव्या हातावर हत्याराने वार झाल्याने तो जागा झाला. यावेळी वडील आशिष यांच्या हातात चाकू दिसला व ते त्याच्यावर पुन्हा वार करण्याच्या प्रयत्नात असतानाच देवने तेथून पळ काढला. तो आईच्या खोलीत गेला व दरवाजा आतून बंद केला. त्या वेळी आई ज्योती कौशिक (वय ५४) पलंगावर जखमी अवस्थेत पडल्याचे व संपूर्ण गादी रक्ताने माखल्याचे दिसून आले.
घटनेनंतर आशिषला चक्कर आल्याने तो खाली पडला. उपचारासाठी आशिषला रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आशिष चा मृत्यू कशामुळे झाला अद्याप करू शकले नाही. मात्र आपल्या पत्नीला आशिष ने मारहाण का केली हे गुलदस्त्यातच आहे.
याघटने नंतर अंबड परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान आशिष ने मुलीवरही हल्ला केला होता. मात्र ती पळून गेल्याने बचावली. रक्ताच्या थारोळ्यात आईला बघितल्यानंतर आशिष च्या मुलाने आपल्या नातेवाईकांची संपर्क साधून मदतीसाठी बोलावून घेतले. बेडरूमच्या बाहेर आशिष जमिनीवर पडलेला होता. ज्योती व आशिष दोघा पती-पत्नींना रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र आशिषला डॉक्टरांनी मृत घोषित केले आशिष चा मृत्यू कशामुळे झाला ते अद्याप करू शकले नाही . या प्रकरणाचा तपास अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण शेजवळ उत्तम सोनवणे करीत आहेत .
पती-पत्नीच्या भांडणात पतीचा मृत्यू अंबड परिसरात खळबळ
Recent Comments
on Hello world!