नाशिक : पंचवटीमध्ये घरफोडीचे सत्र सुरूच असून बंगल्याच्या लोखंडी सेफ्टी दरवाजाचे लॅच आणि दरवाजाचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश करत बेडरूम आणि हॉलमध्ये ठेवलेले १० लाखांचे दागिने चोरी करण्यात आले. एस.एस.डी नगर परिसर पंचवटी येथे हा प्रकार घडला. पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजित पवार (रा. मातोश्री बंगला,पंचवटी)
यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चार लोखंडी शटरचे कुलूप तोडून दिवस कार्यक्रमानिमित्त कुटुंबीयांसमवेत बाहेरगावी गेलेलो असताना त्यांच्या बंगल्याचे तळमजल्यावरील बंगल्यात प्रवेश केला. पहिल्या मजल्यावरील मुख्य दरवाजाचे लॅच तोडून बंगल्यात प्रवेश करत बेडरूम आणि हॉलमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीचे देव, भांडी, तांबे पितळाचे भांडे, रोकड चोरी केली. पवार घरी आल्यानतंर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. पंचवटी वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
१० लाखांचे दागिने चोरी
Recent Comments
on Hello world!