HomeCrimeचिमुकलीचा गळा चिरून हत्या

चिमुकलीचा गळा चिरून हत्या

 

नाशिक : सातपुर

तीन महिन्याच्या चिमुकलीचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील धृवनगर परिसरात घडली. या प्रकरणी गंगापुर पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धृवांश भूषण रोकडे वय ३ महिने, असं हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. गंगापूर सातपूर लिंक रोड येथील धृव नगर परिसरात भूषण रोकडे हे पत्नी, आई व ३ महिन्याची चिमुकली धृवांशी यांच्यासमवेत राहतात. भूषण हे सातपूर येथील एका कंपनीत सुपरवायझर म्हणुन कामाला आहेत.

सोमवारी ते नेहमीप्रमाणे कामाला गेले. तेव्हा घरात त्यांच्या आई व पत्नी दोघीच होत्या. सायंकाळी त्यांची आई दूध आणण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या . त्यावेळी भूषण यांची पत्नी व चिमुकली धृवांशी घरात होत्या. या गोष्टीचा फायदा घेत एक पंजाबी ड्रेस घातलेली अज्ञात महिला अचानक घरात घुसली.

या महिलेने धृवांशी हिच्या आईच्या नाकाला रूमाल लावत बेशुद्ध झाल्यानंतर या क्रूर महिलेने पलंगावर झोपलेल्या तीन महिल्याच्या निरागस धृवांशीचा धारधार शस्त्राने गळा चिरला. काही वेळानंतर भूषण यांच्या आई दूध घेऊन घरी आल्या. त्यांनी आपल्या सूनेला बेशुद्ध अवस्थेत पडलेले बघितले. दुसरीकडे चिमुकली नात धृवांशी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. संपूर्ण प्रकार बघताच आरडाओरड करून या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर तातडीने धृवांशी व तिच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात जाण्यापूर्वीच धृवांशीचा दुर्देवी मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे पथक सह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
हत्या कुठल्या कारणातून करण्यात आली. याबाबत पोलिसांनी तपास करत आहेत . मुलीची आई शुध्दीवर आली आहे. पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!