नाशिक : शहर
पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ११मार्च २०२३ रोजी मुंजाबाबा गल्ली, तीन पुतळ्या जवळ, फुलेनगर, पेठरोड, पंचवटी, नाशिक येथे जुन्या भांडणाची कुरापत काढत अज्ञात इसमांनी गोळीबार व कोयत्याने हल्ला केला होता. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात
फिर्यादी प्रेम दयानंद महाले यांनी फिर्याद दिली होती. त्याचा मित्र असे उभे असतांना संशयित विशाल चंद्रकांत भालेराव, संदीप अहिरे, जय खरात हे हातात कोयते घेवुन व त्यांचे सोबत असलेला विकी वाघ हा हातात बंदुक घेवुन तेथे आले असता. त्यावेळी विशाल भालेराव याने काहीएक कारण नसतांना फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचेकडील हत्यारानिशी हल्ला केला . फिर्यादीने सदरचा हल्ला चुकवुन घाबरून घराचे दिशेने जिव वाचविण्यासाठी पळु लागला, तेव्हा संदीप अहिरे याने रस्त्यावर पडलेली विट फेकून मारली. तसेच विकी वाघ याने त्याचे हातातील बंदुकीतुन गोळ्या झाडल्या, त्यामध्ये फिर्यादीचे आईचे उजव्या छातीजवळ एक गोळी चाटुन गेली . आईचे मागे असलेल्या फिर्यादीचे मावशीचा पाळीव कुत्रा टॉमी याच्या पायाला देखील गोळी लागली. संशयित फरार झाले होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शन खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, रणजित नलावडे, पोलीस निरीक्षक (प्रशा-गुन्हे) यांच्या सह गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, पोलिस निरीक्षक प्रतिक पाटील, रोहीत केदार आधीच्या पथकाने मखमलाबाद परीसरातुन संशयित विकास उर्फ विकी विनोद वाघ (वय २५ वर्षे, रा.मरी माता मंदीरा मागे, पाटकिनारी, फुलेनगर, पंचवटी, नाशिक) , जय संतोष खरात ( वय १९ वर्षे, रा. संदीप लाँड्रीजवळ, शेषराव महाराज चौक, फुलेनगर, पंचवटी, नाशिक) , संदीप रघुनाथ अहिरे (वय ३० वर्षे, रा. संदीप लॉंड्रीजवळ, शेषराव महाराज चौक, फुलेनगर, पंचवटी, नाशिक) यांना ताब्यात घेण्यात आले. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि / विलास पडोळकर हे करीत आहेत.
गोळीबार करून दहशत करणारे ०३ संजयित आरोपी जेरबंद पंचवटी पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनिय कामगिरी
Recent Comments
on Hello world!