Homeनाशिक लोकलजिल्हा रुग्णालयातील अनागोंदी कारभार थांबवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा आरोग्य उपसंचालकांना...

जिल्हा रुग्णालयातील अनागोंदी कारभार थांबवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा आरोग्य उपसंचालकांना निवेदन

जिल्हा रुग्णालयातील अनागोंदी कारभार थांबवा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा आरोग्य उपसंचालकांना निवेदन
नाशिक : जिल्हा
जिल्हा रुग्णालयात सध्या अनागोंदी कारभारामुळे सर्व सामन्य नागरिक हैराण झाले आहे. रुग्णालयात अनुभवी व तज्ञ डाँक्टरांचा अभाव असुन ट्रेनी डाँक्टराची संख्या अधिक असल्यामुळे रुग्णांच्या आजारांचे निदान होत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. मोफत असलेली औषधे बाहेरुन विकत आणावे लागत आहे. एक्स रे, सिटी स्कॅन मशिन सारखे मशनरी बंद अवस्थेत असल्याने खाजगीतुन तपासणी रुग्णालयात करावी लागत आहेत. रुग्णालयात दिले जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा असून त्यांची चौकशी करण्यात यावी. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार यांच्या साठी केस पेपर चा खिडकी बंद असुन ती त्वरित सुरु करावी. अपंग व्यक्तींना देण्यात येणारे दाखले त्वरित देण्यात यावे. आदी मागण्या संदर्भाचे निवेदन आरोग्य उपसंचालक व जिल्हाशल्य चिकीत्सक यांना डाँ बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्ष प्रमुख प्रकाश पगारे यांनी निवेदन दिले. लवकरात लवकर समस्याचे निराकरण करण्यात यावी. रमेश म्हस्के, संजय सानप, रेखा शेलार, चंद्रकला बुरडे आदीच्या शिष्टमंडळाने दिले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!