मालेगाव च्या कृषी पर्यवेक्षकास २ हजारांची लाच घेताना अटक
- मालेगाव : तक्रारदार व त्यांचे भाऊ यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ( पोकरा स्कीम) अंतर्गत ठिबक सिंचन या बाबिसाठी लाभार्थी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. सदर योजनेच्या अटीनुसार तक्रारदार व त्याचा भाऊ यांनी त्यांचे कुटुंबाचे शेतजमिनीवर फळबाग लागवड करून ठिबक सिंचनाचे काम केलेलं आहे. सदर ठिबक सिंचनाचे कामाचे फाईलची तपासणी करून बिले ऑनलाईन अपलोड करणेसाठी कृषी पर्यवेक्षक वर्ग 3 मालेगाव . जिल्हा नाशिक सुधाकर विश्वनाथ सोनवणे ( वय- 54) यांने तक्रारदाराला प्रत्येक फाईल चे 1 हजार – असे रुपये 2 हजाराची लाचेची मागणी केली. मंगळवारी (दि 21) लाच स्वीकारतांना अटक केली. पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक साधना भोये बेलगावकर, हवालदार चंद्रशेखर , हवालदार सचिन गोसावी, हवालदार प्रफुल्ल माळी, नाईक विलास निकम, संदेश बताटे, परशुराम जाधव यांच्या पथकाने केली