नाशिक : जिल्हा
अधिक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अलका अहिरराव नाशिक यांच्या बदलीने रीत झालेल्या जागेचा पदाचा अतिरीक्त कार्यभार अन्यायकारक पद्धतीने सेवा जेष्ठता डावलून सेवा जेष्ठता असताना कार्यकारी अभियंता सागर शिदे यांना सोपविताना आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन परीपत्रक क्रमांक: एसआरव्ही2018/प्र.क्र.208/कार्या.12 ( अतिरीक्त कार्यभार सोपविताना विचारात घ्यावयाच्या मार्गदर्शक सुचना) दिनांक 05 सप्टेंबर 2018 च्या शासन परीपत्रकाचे उल्लंघन करून अपात्र अधिकारी यांना सोपवताना आर्थिक देवाण घेवाण करण्यात आली आहे. त्याची लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी करण्यात यावी, सागर शिंदे हे सतत गेली 7 ते 8 वर्षे नाशिक विभागातच कार्यरत आहेत. त्यांची तात्काळ अकार्यकारी पदावर नेमणूक देण्यात येवून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मंजूरी दिलेल्या सर्व कामांचीही चौकशी करण्यात यावी . शासनाने योग्य व पात्र व्यक्तींना अधिक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक चा कार्यभार सोपवावा . नाशिक पाटबंधारे मंडळाचा ही कार्यभार ही योग्य व पात्र सक्षम कार्यकारी यांचेकडे सोपवावा त्याकरीता दिनांक मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 पासून जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र विभागाचे प्रवेशद्वारावर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा भारत जाधव यांनी दिला