HomeCrimeतलाठी व कोतवाल लाच घेतांना अटक

तलाठी व कोतवाल लाच घेतांना अटक

 

तलाठी व कोतवाल लाच घेतांना अटक
जळगाव : जिल्हा

तक्रारदार यांच्या वडीलांनी केलेल्या मृत्यूपत्रान्वये तक्रारदार यांचे नावे बोरखेडा बु येथील शेतजमीन केलेली आहे. तक्रारदार यांचे हिश्यावर एकुण ३ गट वाटणीस आलेले आहेत. सदर ३ गटांपैकी ६४/२ ही शेतजमीन तक्रारदार यांना त्यांची पत्नी प्रतिभा पाटील यांचे नावे करायची आहे. जेणेकरून ते अल्पभूधारक म्हणून गणले जातील,म्हणून नोव्हेंबर-२०२१ मध्ये शेती पत्नीच्या नावे करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून एकुण ७ हजार रुपयाची लाच ज्ञानेश्वर सुर्यभान काळे ( वय-५० वर्ष, तलाठी, मौजे बोरखेडा बु॥, तलाठी कार्यालय, ता. चाळीसगाव, जि.जळगाव. (वर्ग-३) रा.शिवशक्ती नगर, भडगाव रोड, चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगाव) लाच घेतली. तरी देखील सदर काम न झाल्यामुळे तक्रारदार यांना तलाठी कार्यालयात जावून भेटले असता त्यांनी तक्रारदार यांच्या नावे असलेली शेतजमीन .प्रतिभा पाटील यांचे नावे करण्याच्या मोबदल्यात प्रथम ७ हजार रुपये व तडजोडीअंती पंचासमक्ष ५ हजार -रू
आलोसे ज्ञानेश्वर सुर्यभान काळे, वय-५० वर्ष, तलाठी, मौजे बोरखेडा बु॥, तलाठी कार्यालय, ता. चाळीसगाव, जि.जळगाव. (वर्ग-३) रा.शिवशक्ती नगर, भडगाव रोड, चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगाव व
, संशयित किशोर गुलाबराव चव्हाण, वय-३७, कोतवाल, मौजे बोरखेडा बु॥, तलाठी कार्यालय, ता.चाळीसगाव, जि.जळगाव, रा.श्रीकृष्ण नगर, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि.जळगाव. (वर्ग-४) यांनी प्रथम ७ हजार -रू. व तडजोडीअंती ५ हजाराची रु लाच स्विकारली असता पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले.पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,
शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर अधिक्षक एन.एस.न्याहळदे , पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!