अल्पवयीन बालिकेशी गैरवर्तन प्रकरणी एकास श्रम कारावासाची शिक्षा
nnनाशिक : वार्ताहरnnअल्पवयीन बालिकेशी अश्लील गैरवर्तन केल्याच्या आरोपातून न्यायालयाने प्रसाद राजाराम कारमपुरे (वय २१ वर्षे, रा. शीतल धारा सोसायटी, आर.टी.ओ. कॉलनी, बोधलेनगर) यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली .अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे (विशेष पोक्सो न्यायालय) न्यायाधीश एस. एस. खरात यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे सहायक अभियोक्ता म्हणून एस. एस. गोरे यांनी पुरावा सादर करत युक्तिवाद केला.nnअभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट २०२० रोजी रात्री नऊ वाजता घटना घडली होती. आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन तिला बाहेर बोलावले. तिच्यासोबत गैरवर्तन करून मनास लज्जा उत्पन्न होईल असेnnकृत्य केले. कोणाला सांगितले, तर ‘मी शाळेत बदनामी करील’ अशी धमकी दिली होती. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात भादंवि ३५४, ३५४ (ड) बालकांचे लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक जे. आर. अनवणे यांनी केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.nnन्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीविरुध्द फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस भादंवि कलम ३५४ (ड) व बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ८ मध्ये ०१ वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ०१ महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.