तेवीस हजारांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार व कोतवाल ताब्यात
एरंडोल तहसिल कार्यालय येथे जमा असलेले ढंपर व वाळू वाहतूक करत असलेले दुसरे ढंपर तक्रारदार यांचे दोन्ही ढंपर वाहनांनी धरणगाव हद्दीमधुन वाळू वाहतूकीचा व्यवसाय कारवाई न करता चालु देण्याच्या मोबदल्यात 23 हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार व कोतवाल यांना लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडत कारवाई केली.nnदोन्ही ढंपर वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात. दोन ढंपर वाहनांपैकी एक ढंपर वाहन हे एरंडोल तहसिल कार्यालय येथे जमा आहे. यापूर्वी देखील ढंपर अडवून जागेवरच सोडून देण्यासाठी तक्रारदार यांचेकडून दि.०१ मार्च २०२३ रोजी ३० हजार रुपये व दि.११ मार्च २०२३ रोजी २३ हजार रुपयाची लाच स्वीकारताना . एरंडोल तहसिल कार्यालय येथे जमा असलेले ढंपर व दुसरे वाळू वाहतूक सुरू असलेले ढंपर असे तक्रारदार यांचे दोन्ही ढंपर वाहनांनी धरणगाव हद्दीमधुन वाळू वाहतूकीचा व्यवसाय कारवाई न करता चालु देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपये प्रमाणे दोन्ही ढंपरचे प्रथम ३० हजार रुपये व तडजोडीअंती २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. पाळधी पोलीस दुरक्षेत्राच्या बाजुस असलेल्या रस्त्यावर स्वीकारतांना तहसिल कार्यालय धरणगाव येथूनnनायब तहसीलदार जयवंत पुंडलीक भट ( वय-५१ वर्ष, नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, धरणगाव ता.धरणगाव, जि.जळगाव) , दुसरा संशयित कोतवाल राहुल नवल शिरोळे ( वय-३०, कोतवाल, पाळधी तलाठी कार्यालय , ता.धरणगाव, जि.जळगाव ) दोन्ही संशयितांना अटक केली. या प्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर घारगे, अप्पर अधिक्षक नारायण न्याहाळदे, उप अधीक्षक नरेंद्र पवार, उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीnपोलीस निरिक्षक एन.एन.जाधव, पोलीस निरीक्षक एस.के.बच्छाव, दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे, राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.