July 14, 2026

पुरोगामी विचारसरणीचे राहुल बनसोडे यांचे आकस्मित निधन

0

नाशिक लोकल : नाशिकरोड जेलरोड पंचक मोरे मळा येथे वास्तव्यास असलेले राहुल बाळासाहेब बनसोडे यांचे आकस्मित निधन झाले आहे ते पुरोगामी विचारसरणीचे होते. नाट्यनिर्माता राहुल बाळासाहेब बनसोडे यांचे वयाच्या ४२‌ यावर्षी आकस्मित निधन झाले. बनसोडे हे आयटी उद्योजक होते. अॅप्लिकेशन नेक्सस वेबसर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीचे संस्थापक संचालक असलेले बनसोडे हे शुक्रवारी (दि. (२४) नाशिकरोड येथील कार्यालयात कामासाठी आले असता जिना चढताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे ते तेथेच कोसळले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. साहित्य, तंत्रज्ञान, पर्यावरण, दलित चळवळ, इंग्रजी साहित्य असा विविधांगी त्यांचा अभ्यास आणि व्यासंग होता.बनसोडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.बनसोडे यांनी अनेक वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमातून लिखाण केले, मात्र, अनॉनिमस कंटेंट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही त्यांची नाटके विशेष गाजली. इंटरनेट आणि समाज माध्यमांच्या अतिरेकी वापरातून मानवाची कशी अधोगती होते, हे त्यांनी निर्मिती केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नाटकात मांडले. त्याचे २३ प्रयोग झाले. कोरोनामुळे पुढील नाटकांत खंड पडला. मात्र, गेल्याच आठवड्यात मुंबई येथे या नाटकाचा प्रयोग झाला. मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणावर होणारा प्रतिकूल परिणाम त्यांनी जीवाश्म तसेच उद्या हे माहितीपटातून दाखवला. त्यांच्या जीवाश्म या नाटकाला अनेक पुरस्कारदेखील मिळाले होते. बनसोडे यांच्या निधनामुळे त्यांच्या मित्रपरिवाराला धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *