July 14, 2026

सहाय्यक निबंधक व लिपिकास 20 लाखांची लाच घेतांना अटक

0

 nnसहाय्यक निबंधक व लिपिकास 20 लाखांची लाच घेतांना अटकnn nnनाशिक : मुंबई नाकाnnतक्रारदार याच्या आजोबांवर सावकारी कायद्यान्वये कारवाई करण्यात येऊ नये. यासाठी तक्रारदार यांच्याकडे 20 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. 20 लाख रुपये लाचेची रक्कम मुंबई नाका येथे सहाय्यक निंबधक रणजीत महादेव पाटील, (वय-32 वर्ष, पद- सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नेमणूक-सहकारी संस्था निफाड, अतिरिक्त कार्यभार सिन्नर) व लिपिक प्रदीप अर्जुन वीर नारायण (वय-45 वर्षे, पद- वरिष्ठ लिपिक निफाड, कार्यालय-सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निफाड) तक्रारदार याच्याकडून 20 लाखांची लाच  स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले . मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र शर्मिष्ठा घारगे-वालावलकर , अप्पर अधिक्षक नारायण न्याहाळदे, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकसंदीप साळुंखे , प्रवीण महाजन , नितीन कराड, प्रभाकर गवळी आदी च्या पथकाने घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *