July 13, 2026

सगुणा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती उत्सवात साजरी.

0

सालाबाद प्रमाणे याही वर्षी सगुणा बहुउद्देशीय संस्था व पी. डी गांगुर्डे सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंती आतिषय उत्साहात साजरी करण्यात आली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा,शिवाजी रोड, शालिमार येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना अभिवादन करण्यासाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर मुलींचे वस्तीगृह नाशिक येथील मुलींच्या उपस्थितीत बौद्धाचार्य महेश पगारे यांनी बुद्ध वंदना घेऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व पुष्पगुच्छ वाहण्यात आली.nया प्रसंगी वसतिगृहाचे सेक्रेटरी पी.के गायकवाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे थोडक्यात आपले विचार मांडून मार्गदर्शन केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्रीपादजी कुलकर्णी श्री. समर्थ सहकारी बँक नाशिक,मिलिंद सजगुरे नरेंद्र कुलकर्णी सचिन मराठे शिव,प्रथमेश गीते,गौतम भालेराव,आबासाहेब सोनंजे मनोज बाग मंदार तगारे पुष्कर पाराशरे ,तेजश्रीताई काठे,अनिताताई भामरे,विषाल पवार,पि. डी. काळे,प्रा.उमेश पठारे,जयराम वाघ,अशोक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. वस्तीगृहातील मुलांना अन्नदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष राजेश गांगुर्डे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पी.डी. काळे यांनी केले तर आभार सेक्रेटरी दिपक कटारे यांनी मांडले. कार्यक्रमास संस्थेचे संचालक राजेश उपासनी, भालचंद्र जाधव, सुशील बर्वे, अरुण शाहकर, रतन शिंदे, लभिब मुल्ला, राजेश शेळके, नितीन काळे, गणेश कळमकर, सुधीर गायकवाड, दत्ता गांगुर्डे, नाना तेजाळे, आत्मज उपासनी, एजाज शेख, संदीप गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *