सिडको परिसरात युवकाचा खून.
नाशिक शहरात दहशतीचे सत्र सुरूच आहे. नाशिक मधल्या सिडको मध्ये एका युवकाची चोपर व कोयत्याने निवडून हत्या करण्यात आले आहे. सिडको परिसरातील राहणारा परशुराम बाळासाहेब नजान ( वय २६ रा . पाथर्डी गाव )* सदर मुलाचा सावता नगर सिडको येथे खून झालेला आहे.
n
सावता नगर भागात असलेल्या एका खानावळ मध्ये जेवत असलेल्या चार जणांपैकी एकावर बाहेरून आलेल्या चार ते पाच जणांनी दगडफेक करीत धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेने संपूर्ण सिडको हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे खून झाल्याची माहिती मिळतात घटनास्थळी अंबड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेत संशयतांच्या मार्गावर पोलिसांची विविध पथके पाठवली आहे मारहाण करणारे संशयित कामटवाडे गाव येथील असल्याची माहिती समजते आहे. परशु नजान वय वर्ष 25 रा. पाथर्डी फाटा असे मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी परिसरात बघायला मिळाली अंबड पोलीस ठाण्यासह गणेशोत पथक तसेच युनिट दोनचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल होऊन तपास करीत होते अद्याप हत्येचे कारण समजू शकले नसून यादृष्टीने पुढील तपास पोलीस यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आला आहे नुकताच गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा खुनाचा प्रकार समोर आल्याने सिडकोवात्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस प्रशासनाचा धाकच नसल्याने पोलीस यंत्रणा करते तरी काय असा प्रश्न या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
n
परशुरामच खून का झाला याचे कारण अद्याप करू शकले नाही. मात्र परशुराम चे मारेकरी पोलिसांच्या तावडीतून फरार झाले आहेत. रात्री उशिरा ही घटना घडल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन संशयित आरोपी पसार झाले. रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्याचे काम पोलीस स्टेशनमध्ये चालू होते.