दरोडेच्या तयारीत असलेला संशयित गावठी कट्टा सह पोलिसांच्या ताब्यात दरोडा विरोधी पथकाची कारवाई
नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची स्पेशल टीम दरोडा व शस्त्र विरोधी या पथकाने संभाव्य दरोडा टाकणाऱ्या संस्थेचा अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा हस्तगत केला आहे. दरोडा शस्त्र विरोधी पथकातील महेश खांडबहाले यांना आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत संशयित आरोपी पद्माकर राजेंद्र विसपुते याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तोल असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे संशयित आरोपी पद्माकर राजेंद्र विसपुते वय 39 वर्ष राहणार नांदूर नाका तुळजाभवानी मंदिराच्या मागे आडगाव नाशिक सदर संशयित आरोपीकडे गावठी देशी बनावटीचे पिस्तोल मॅक्झिन सह एक जिवंत काडतुस ऑटो रिक्षा क्रमांक MH- 15- F U – 6099 मिळून आले. संशयित आरोपी विसपुते यांनी शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केले म्हणून त्याच्यावर आडगाव पोलीस स्टेशन येथे शस्त्र अधिनियम कलम 3/25 सह 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी विसपुते पोलिसांच्या ताब्यात आहे. सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक किरण रौंदळ विजयकुमार सूर्यवंशी महेश खांडबहाले संदीप डावरे विशाल जोशी प्रवीण चव्हाण मनीषा कांबळे यांनी संयुक्तरित्या पार पडली आहे.