ग्रामसेवक व सरपंचा स लाच घेतांना ताब्यात
nnनाशिक : तक्रारदार यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये बोराळे ग्रामपंचायतचे लोखंडी जिन्याचे काम 50 हजार -रुपये करण्यासाठी घेतले होते. सदर कामाची उर्वरित 20 हजार त्यांचे किंवा मुलाचे अकाऊंटवर जमा करण्यासाठी संशयित क्र 2 सरपंच बाकेराव भाऊसाहेब जाधव ( वय 50वर्षे धंदा सरपंच,बोराळे ग्रामपंचायत ता चांदवड जि नाशिक)nयांनी 15 हजार रुपये फोनद्वारे लाचेची मागणी केली. संशयित क्र 1 कंत्राटी ग्रामसेवक (वर्ग- 3) बोराळेnआतिश अभिमान शेवाळे (वय 28 वर्ष. कंत्राटी ग्रामसेवक (वर्ग- 3) बोराळे ग्रामपंचायत ता चांदवड जि.नाशिक )nयांनी स्वतःसाठी 7 हजार 500/-रुपये व इलो क्र 2 सरपंच बाकेराव भाऊसाहेब जाधव ( वय 50वर्षे धंदा सरपंच,बोराळे ग्रामपंचायत ता चांदवड जि नाशिक) यांचेसाठी 7 हजार 500/-रुपये लाचेची तक्रारदार यांच्याकडे अशी एकूण 15 हजार – रुपये लाचेची मागणी केली. आलोसे क्रमांक 1 आतिश अभिमान शेवाळे ( वय 28 वर्ष. कंत्राटी ग्रामसेवक) यांनी 15 हजार रुपये लाचेची रक्कम ही पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आलोसे व इलोसे यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, उप अधीक्षक वैशाली पाटील, पो. ना. शरद हेंबाडे , पो. ना.राजेंद्र गिते परशराम जाधव आदीच्या पथकाने केली.