अपघातातील गुन्हे उघडकीस येण्यासाठी पंचनामा करणाऱ्या पोलिसांचीच फिर्याद घेण्याच्या पोलीस आयुक्तांच्या सूचना
nnनाशिक : अपघातातील गुन्ह्यात अपघातग्रस्त, अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नातेवाइक किंवा ते नसल्यास प्रथमदर्शनी व्यक्तीची फिर्याद घेत अपघाताचे गुन्हे दाखल करण्यात येत होते . मात्र पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अपघातातील गुन्हे उघडकीस येण्यासाठी पंचनामा करणाऱ्या पोलिसांचीच फिर्याद घेण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना केल्या आहे.nnअपघातांचा गुन्हा दाखल करण्यासाठी एकतर फिर्यादीच कोणी नसते किंवा नातेवाइकांनी वा इतर कोणी गुन्हा दाखल केलाच . आरोपीकडून तो मागे घेण्यासाठी दबाब टाकला जातो. यामुळे हे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण घटत असल्याने संबंधित पोलिस ठाण्याचा कर्मचारीच फिर्यादी असणार आहे. अपघाताचा गुन्हा घडल्यानंतर फिर्यादी तपासी अधिकारी यांच्या तपासात नुकसानग्रस्त व्यक्तीला न्याय मिळणार असल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे