राज्यातील सर्वात मोठया सत्तासंघर्षाच्या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष
nnदिल्ली : राज्यातील सर्वात मोठया सत्तासंघर्षाच्या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. सदर निकाल उद्या येणार असल्याची शक्यता आहे . सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान टिपण्णी केली आहे. घटनापीठाकडून आज दोन महत्वाच्या निकाल लागण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी दिल्यानेnसंघर्षवर काय निर्णय येतो याकडे लक्ष लागले आहे.nnया सर्व प्रकरणातील सर्वात मोठा अन् कळीचा मुद्दा असणार आहे तो शिवसेना ठाकरे गटाकडून ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेची मागणी करण्यात आली आहे? त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ काही निर्णय घेणार की हे प्रकरण विधानसभेत विधानसभा अध्यक्षांकडे (तत्कालिन की विद्यमान हा सुद्धा पेच आहे) पाठवलं जाणार याकडेही लक्ष आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात विधानपरिषद निवडणूक पार पडल्यानंतर सत्तासंघर्ष नाट्याला सुरुवात झाली होती. या नाट्यामध्ये पहिल्या पाच दिवसांमध्येच अपात्रतेची नोटीस ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना बजावण्यात आली होती आणि त्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. यामध्ये दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. त्यामुळे त्यांच्यासह अपात्रतेची नोटीस बजावलेल्या 16 आमदारांच्या भवितव्याचा निकाल काय लागणार? याकडे सर्वाधिक लक्ष आहे.