प्रसार माध्यम प्रतिनिधींचा काही चुकतं का ? आम्हालाच मारहाण का ? आयोजकांनी उत्तर द्यावे ?
आमचा काय दोष ? आम्हाला मारहाण कशासाठी ? आम्ही वृत्तांकन करायचे नाही का ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी ठक्कर डोम येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला. गौतमी पाटील येणार अर्थात आंबेटसौकिनांची तेथे गर्दी होईल हे मनसेच्या कार्यकर्त्यांना माहीत होते. गौतमी पाटील चे अश्लील झटके पाहिला मद्यपी टवाळखोर गावगुंड येणारच म्हणून गौतमी पाटील च्या संरक्षणासाठी बाउंसर सह पोलीसही उपस्थित होते. गौतमी पाटील च्या स्टेजपर्यंत पोहोचू नये म्हणून आयोजकांकडून पोलिसांकडून बाउन्सर कडून कडे कोट नियोजन केले होते. वार्तांकन करणाऱ्या प्रतिनिधींसाठी वेगळा ताई तयार करण्यात आला होता. गौतमी पाटील च्या कार्यक्रमात मध्य धंदा अवस्थेत नाचणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. गौतमी पाटील च्या एका गाण्याने कहर केला आणि अख्खा गौतमी पाटीलचा श्रोतावर्ग नाचू लागला मात्र यातील काही मद्यपी गुंडांना गौतमी पाटील ला आपला डान्स दाखवायचा होता म्हणून त्यांनी प्रसार माध्यमांच्या स्टेजचा ताबा घेतला आणि बेधुंद अवस्थेत स्टेजवर नाचू लागले वृत्तांकन करणाऱ्या अप्रतिनिधींना अडथळे होऊ लागली म्हणून त्यांनी त्या गुंडमध्येपींना आपण खाली नाचा आम्हाला वार्तांकन करता येत नाही कॅमेरा हलतो आहे असे सांगितले आणि याच गोष्टीचा त्या मद्यपी का गुंडांना राग आला. टीव्ही नाईन च्या कॅमेरामनला मारहाण करण्यात आली त्याला सोडवण्यास गेलेल्या दिव्या मराठीच्या फोटोग्राफरलाही मारहाण करण्यात आली दोघांनाही रक्त भांभाळ करण्यात आले हा सर्व प्रकार पोलीस व तेथील नागरिक उघड्या डोळ्यांनी पाहत होते. वृत्त प्रतिनिधींच्या अंगावर खुर्च्या तोडण्यात आल्या. मात्र गौतमी पाटील चा शो तसाच चालू होता या हाणामारीचे सोयर सुतक ना आयोजकांना होते ना पोलिसांना ना गौतमी पाटीलच्या अंगरक्षकांना नात्या अनाधिकृत बाउन्सर ठेवलेल्या पैलवानांना यातील एकाने ही हाणामारी सोडवण्याचा किंवा त्या वार्तांकन करणाऱ्या प्रतिनिधींना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. पत्रकारांची जबाबदारी तशी आयोजकांची असते मात्र मारहाण झाल्यावर ही जबाबदारी कोणी स्वीकारत नाही ही शोकांतिका आहे. या दोन वृत्तांत करणाऱ्या प्रतिनिधींना जबर मारहाण करण्यात आली या दोघांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र पोलिसात ना आयोजकांच्या विरोधात फिर्याद नात्या मद्यपी गुंडांच्या विरोधात फिर्याद . प्रसार माध्यम प्रतिनिधींनी न्याय मागायचा कुणाकडे असा सवाल आता नाशिकमध्ये उपस्थित झाला आहे. नाशिक पोलीस आयुक्तांनी या संदर्भात सखोल तपास करून आयोजकांवर तथा पत्रकारांना मारणाऱ्या मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे