July 13, 2026

नाशिक रोड पोलिसांचा एमडी गोडावनवर छापा

0

नाशिक रोड मधील शिंदे पळसे एमडी ड्रक्सचे सेंटर आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही कारण मुंबई साकीनाका पोलिसांनी कारवाई केल्यानंतर नाशिक रोड येथील शिंदे पळसे परिसरातील एमआयडीसी एरियात नाशिक रोड पोलिसांनी एमडीसाठी कच्चा माल पुरवणाऱ्या गोडावनवर छापा टाकला आहे.. 300 कोटी 26 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. नाशिक शहरात एमडी ड्रक्स विरोधी ही सर्वात मोठी कारवाई असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिंदे गावात या आधी सील केलेल्या एमडी ड्रग्स निर्मिती करणाऱ्या कारखान्यापासून जवळच गोडाऊन मध्ये तयार करण्यासाठी वापरला जाणारा कोट्यावधी रुपयाचा कच्चामाल नाशिक रोड पोलिसांनी जप्त केला आहे पोलिसांकडून मध्यमालाबाबत अधिकृत आकडेवारी समोर आली नाही पोलिसांची कारवाई सुरू असल्यामुळे खरा आकडा समजू शकला नाही गेल्या काही वर्षात एमडी या घातक नाशिक शहरात नाशिक शहरात तरुणाईला आपल्या विळख्यात घेतले आहे शाळा कॉलेजचे विद्यार्थी हेरून हा एमडी ड्रक्सचा व्यापार वाढला आहे. मानवी शरीरासाठी घातक असलेल्या या ट्रक्समुळे अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे. युवा पिढी मोठ्या प्रमाणात या व्यसनाच्या विळख्यात सापडले आहे. नाशिक पोलिसांनी कठोर पावले उचलून ड्रग्स विकणाऱ्या या संस्थांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर क** कारवाई करावी अशी नाशिककर यांच्या अपेक्षा आहे. नाशिक पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत नाशिककर यांनी केले आहे या गुन्हा संदर्भातील नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक हेमंत फळ साहेब पोलीस निरीक्षक विशाल शेळके आदींनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *