भगूर मध्ये स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन साजरा.
भगूर मध्ये स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन साजरा साहेबांच्या भगूर विषयक स्मृतींना देण्यात आला उजाळा. स्वा. सावरकर समूहाच्या वतीने पार पडला भावनिक कार्यक्रम.nnप्रमोद रहाणे l भगुरnnवंदनीय शिवसेनाप्रमुख हिंदुरुदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन सावरकर जन्मभूमीत साजरा करण्यात आला. स्वा. सावरकर समूहाच्या वतीने छ. शिवाजी महाराज चौक येथे हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी भगूरकरांच्या प्रेमापोटी भेट दिलेला, आणि स्वतःच्याच वाढदिवसाच्या दिवशी दिनांक 23 जानेवारी 1970 साली स्वहस्ते अनावरण केलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याशेजारीच साहेबांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करण्याचा हा भावना विवश कार्यक्रम पार पडला. महाराजांच्या पुतळ्याशेजारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा ठेवण्यात आली होती. प्रवीण वाघ यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साहेबांच्या स्मृतीस भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर स्मृतींना उजाळाही देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना ठाकरे गट शहरप्रमुख विक्रम सोनवणे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा देशमुख, अंबादास पाटील, बाळ जोशी, सावरकर समूहाचे मनोज कुवर, सुनील जोरे, निलेश हासे, योगेश बुरके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी आदरणीय शिवसेनाप्रमुखांच्या भगूरशी निगडित स्मृतींना उजाळा देण्यात आला. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी १९ जून १९६६ साली मुंबईत शिवसेनेची स्थापना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या प्रखर, परखड, हिंदुत्ववादी भूमिकेने प्रभावित होऊन मुंबई ठाण्यानंतर तिसरी शिवसेना शाखा नाशिक, भगूर मध्ये स्थापन करण्यात आली. शिवसेना स्थापनेच्या प्रारंभीच्या काळात शरद जोशी, विठ्ठल दिवटे, खंडेराव शिंदे, भगीरथ जाधव, शिवाजी करंजकर, शाहिद सय्यद, अशोक पवार, आनंदा झुटे, गोटीराम चौधरी, रामनाथ नाना गनोरे, गोविंद खर्डे, बापूराव वाईकर ही सर्व ज्येष्ठ शिवसैनिक मंडळी अग्रेसर होती. या सर्वांना स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास नाशिक भगूर भेटी दरम्यान अनेकदा लाभला. त्यानंतरच्या काळात साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन नंदन रहाणे शिवसेनेत दाखल झाले. आपले वक्तृत्व, कर्तृत्व, इतिहास आणि शिवचरित्रचा अभ्यास, पक्ष संघटनेतील सक्रिय योगदान, यामुळे ते लवकरच साहेबांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून थेट मातोश्रीच्या संपर्कात गेले. सर्वात नंतर शिवसेनेत दाखल होऊन सर्वाधिक काळ शिवसेना प्रमुखांचा सहवास नंदन रहाणे यांना लाभला. भगूर गावानेही साहेबांवर निस्सीम प्रेम केले. श्रद्धा ठेवली. साहेबांनीही भगूरकरावर प्रेम केले. विश्वास,आपुलकी जपली. छत्रपती शिवरायांच्या अर्ध पुतळ्याच्या रूपाने साहेबांनी अनमोल भेट भगूरकरांना दिलीये. ती पिढ्यानपिढ्या सर्वांना प्रेरणा देत राहील.