July 13, 2026

नाशकात पत्रकार सन्मान पुरस्काराचे आयोजन.

0

महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन सन्मान सोहळाn

प्रमोद रहाणे l नासिक.महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघाच्या वतीने  पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिन सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेला नाशिकच्या शालिमार चौकातील आयएमए हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि सोहळ्याचे निमंत्रक सतीश रुपवते यांनी दिली आहे.

nकार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक भूषविणार असून विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबईचे अध्यक्ष राजा उदाटे यांची उपस्थिती लाभणार आहे. विशेष अतिथी म्हणून दिव्य मराठीचे संपादक अभिजीत कुलकर्णी, पुढारीचे संपादक मिलिंद सजगुरे, लोकनामाचे संपादक जयंत महाजन, दैनिक भ्रमरचे चंदुलाल शहा, दैनिक तिरंगाचे संपादक सुरेश निकुंभ, खासदार हेमंत गोडसे, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी, मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, उद्योजक शेखर शहा, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. राहुल बाविस्कर, डॉ. विजय काकतकर, डॉ. चेतन पाटील, डॉ. संजय लवुळ, डॉ. नितीन बोरसे, डॉ. रोहित लवूळ, डॉ. रोहित ठाकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूषण महाले दिव्य मराठी, ज्ञानेश्वर वाघ पुण्यनगरी, आसिफ सय्यद पुढारी, विक्रांत मते सकाळ, रवींद्र केडिया देशदूत, संजय पाठक लोकमत, हेमंत भोसले आपलं महानगर, लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत, सुधीर कुलकर्णी भ्रमर, दिगंबर शहाणे देशदूत, अजय पाटील पुण्यनगरी, नरेंद्र दंडगव्हाळ लोकमत, राजेंद्र शेळके पुढारी, संदीप जाधव दिव्य मराठी, सतीश निकुंभ सकाळ, आदी पत्रकार बांधवांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघाचे गुलाब मणियार, गणेश सावंत, अविनाश आहेर, संदीप नवसे, राजू शिलावट, नुसर सय्यद, अशोक पंजाबी, विश्वास लचके, सुरेश पवार, दीपक गांगुर्डे, संजय परमार, बापू पगारे, नितीन सातपुते, हर्षवर्धन बोराडे, अनिल गुंजाळ, बंटी आढाव, इजाज शेख, संजय निकम, गौरव काळे, श्याम ओझरकर, सनी खरे, बापू देवरे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *