July 13, 2026

भगूर मध्ये संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी साजरी.

0

प्रमोद राहाणे l भगूर :- संत तुकाराम महाराजांचे शिष्य, टाळकरी, ध्रुपदे, लेखक आणि समाजाला भक्ती मार्ग दाखवणारे संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी भगूर मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली. तेली समाज मंडळ भगुर, संताजी युवा फाउंडेशन आणि भगूर तेली समाज महिला मंडळाच्या वतीने श्री संताजी महाराज मंगल कार्यालयात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. त्यामध्ये संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, आरती, भजन, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज तुपे, बेलू, यांचे प्रवचन, समाजातील मान्यवरांचा, गुणवंतांचा सत्कार, त्याचप्रमाणे सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून भजनी मंडळासह पालखी आणि त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसाद वाटप असे भरगच्च कार्यक्रम समस्त तेली समाज बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तेली समाज मंडळाचे अध्यक्ष मनोहर आंबेकर, पदाधिकारी अंबादास कस्तुरे, अनिल कस्तुरे, संदीप वालझाडे, सचिन दुर्गुडे, कार्यकारणी सदस्य पद्माकर शिरसाठ, प्रदीप कस्तुरे, दत्तात्रय वालझाडे, चंद्रकांत वालझाडे, चेतन बागडे, सुदेश वालझाडे, कैलास गवळी, शांताराम वालझाडे, मोहन गायकवाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास वैशाली ससाने, प्रमिला वालझाडे, रेखा वालझाडे, रेखा शिंदे, सुरेखा कोरडे, मोहिनी वालझाडे, रेणुका गायकवाड, मनीषा महाले, योगिता मोरे, मीनाक्षी गायकवाड, ज्योति भागवत, प्राजक्ता बागडे, पांडुरंग वालझाडे, शिवाजी भागवत, राजेंद्र आंबेकर, नंदू गायकवाड, सचिन गवळी, संदीप गोरे, दिलीप वालझाडे, सुनील ससाने, आदींसह तेली समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *