July 13, 2026

भगूर मध्ये श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा संपन्न.

0

 nnप्रमोद रहाणे l भगुर:- तब्बल पाचशे वर्ष संघर्ष केल्यानंतर येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य, दिव्य, संपूर्ण जगाला अभिमान वाटेल अशा जन्मभूमीवरील मंदिरात श्री राम लल्लांची मूर्ती दिमाखाने विराजमान होत आहे. या शुभ मुहूर्ताची कायमस्वरूपी आठवण राहावी या उद्देशाने कोदंडदारी श्रीरामांच्या पंचधातूच्या तीन मूर्ती स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमी अर्थात भगूर मध्ये दाखल झालेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निस्वार्थ सेवा, सरकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणारे अनुलोमचे वस्ती मित्र कैलास भोर मनोज कुवर, रोशन चौधरी यांना अयोध्या येथे पूजन करून आणलेल्या प्रभू श्रीराम यांच्या कोदंडधारी पंचधातूच्या मूर्तीचा प्रदान सोहळा भगूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री बालाजी मंदिरात गुरुवारी सायंकाळी पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिनिधी म्हणून सेवानिवृत्त तहसीलदार डॉ राजश्री अहिरराव यांच्या हस्ते वस्ती मित्रांना मूर्ती प्रदान सोळा पार पडला. तत्पूर्वी तिन्ही मूर्तींचे पूजन तसेच आरती उपस्थितांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुगामी लोकराज्य अभियानचे दीपक मुंडे यांनी केले. डॉ. राजश्री अहिरराव यांनी दिनांक २२ जानेवारीचा श्रीराम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दीपावली सणाप्रमाणे साजरा करावा असे आवाहन केले. संदीप शेटे यांनी श्री राम मंदिर निर्मिती, मूर्ती विराजमान सोहळा या विषयी सविस्तर माहिती दिली. वस्ती मित्र कैलास भोर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास प्रताप गायकवाड, सुनील जाधव, चंद्रशेखर ओहोळ, प्रमोद घुमरे, विक्रम सोनवणे, मधुकर कापसे, अनंत कापसे, गणेश निसाळ, ज्ञानेश्वर कुंडारीया, शांताराम शेटे, शंकर लकारिया, सुनील जोरे, प्रा. ललित भदे, निलेश हा, श्याम देशमुख, पार्वती लकारीया, विमल कासार, अलका देवगिरे, लता भोर, पूजा कांबळे, राणी कांबळे, संगीता भोर, रश्मी ताजनपुरे, रोहिणी कुवर, पल्लवी कुवर, श्रद्धा कुवर आदिसह रामभक्त, भाविक उपस्थित होते.nn 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *