July 13, 2026

देवळालीत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त धार्मिक जनजागरण फेरी.

0

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जनतेला उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने देवळाली कॅम्प मध्ये धार्मिक जनजागरण फेरी पार पडली. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देवळाली भगवामय आणि राममय झाली आहे.nनेत्र दीपक रोषणाई आणि सजवलेल्या रथावर प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, आणि हनुमान यांच्या मूर्ती विराजमान होत्या. हा रथ फेरीत सहभागी करण्यात आला होता. रथावरील जनतेकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल ताशांचा गजर, जय श्रीराम, राम, लक्ष्मण,जानकी, जय बोलो हनुमान की, सियावर रामचंद्र की जय असा जयघोष करीत शहराच्या प्रमुख मार्गावरून जनजागृती फेरी पार पडली. श्री रामाच्या भक्ती गीतांनी अवघे वातावरण राममय झाले होते. दिनांक २२ जानेवारी रोजी श्रीराम लल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दिवाळी सणासारखा साजरा करावा. घरे, मंदिरे यावर भगवे ध्वज पताका लावाव्या, सायंकाळी दिवे प्रज्वलित करावे, घरे, मंदिरांसमोर रांगोळी काढण्यात यावी. विद्युत रोषणाई करावी. मंदिरांमध्ये श्री रामाचे नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन, महाआरती, महाप्रसाद वाटप, मंदिर परिसरांची स्वच्छता, सजावट, करण्यात यावी. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात यावी. पारंपारिक पोशाख परिधान करून हिंदू धर्म संस्कृतीचा सण स्वरूपात हा उत्सव साजरा करावा. असे आवाहन धार्मिक जनजागरण फेरीद्वारे संपूर्ण जनतेला करण्यात आले. जुन्या मध्यवर्ती बस स्थानकावर जनजागरण फेरीचा समारोप करण्यात आला. फेरीमध्ये श्रीराम भगवान प्रतिष्ठान, श्रीकृष्ण व हनुमान मंदिर समिती, तरुण मित्र मंडळ, वाल्मीक मित्र मंडळ, यांसह विविध पक्ष, संघटना, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धार्मिक जनजागरण फेरीत निलेश बंगाली, सोनटी पारचा, प्रीतम आढाव, निशा पुजारी, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, जीवन गायकवाड, सुनील गुप्ता, सुधीर गुप्ता, सुशील चव्हाण, संदीप शिंदे, निलेश यादव,nसंदीप चौधरी, विनोद सारस, रुचीन पुजारी, छाया हाबडे, आदींसह शेकडो रामसेवक सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *