July 13, 2026

स्वा. सावरकर जन्मस्थान स्मारकास भेट देऊन अभिवादन. खा. संजय राऊत

0

 nnप्रमोद राहाणे l भगूर :-nशिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी रविवारी दुपारी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जन्मभूमी अर्थात भगूरला भेट दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी दुपारी भगुर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जन्मस्थान स्मारकाला भेट देऊन सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी भगूरला भेट दिली. आणि तयारीचा आढावा घेतला. पक्षप्रमुख यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन तेथे चर्चा केली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान स्मारकात जाऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला. जवळपास अर्धा तास खासदार राऊत यांनी स्वा. सावरकर जन्मस्थान स्मारकात थांबून स्मारकाची, स्मारकातील छायाचित्रे, वस्तू रचनेची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. तसेच स्मारकातील सावरकरांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सोमवारी दुपारी होणाऱ्या स्मारक भेटीबाबत त्यांनी पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक यांना काही मौलिक सूचना केल्या. यावेळी खासदार राऊत यांच्या समवेत शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नाशिक शहर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड, जयंत दिंडे आदींसह शहर, जिल्ह्याचे, पदाधिकारी स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुखांच्या स्वागतासाठी शहर भगवेमय करून स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे.nnhttps://youtu.be/zvJueVnOBfQ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *