July 15, 2026

जातीय तेढ निर्माण होणारी पोस्ट व्हायरल प्रकरणी तरुणावर कारवाई : भगूर

0

धार्मिक, जातीय तेढ निर्माण होणारी पोस्ट व्हायरल प्रकरणी तरुणावर कारवाई. nभगूर मध्ये काही काळ तणावाचे वातावरण. nदेवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.nnप्रमोद रहाणे l भगुर:- दोन धर्मात जातीय तेढ निर्माण होईल अशी चिंथावणीखोर छायाचित्र आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी भगूरच्या एका २२ वर्षीय तरुणावर देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. सदर पोस्ट व्हायरल होताच भगूर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र देवळाली कॅम्प पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत करीत कारवाईचे पाऊल उचलले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. सोमवारी रात्री उशिरा या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सदर तरुणावर भादवी कलम 153, 295, 66 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे हे करीत आहेत. दरम्यान दोन धर्मात जातीय तेढ निर्माण होईल. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील. दोन धर्मात शत्रुत्व वाढेल. त्यातून दंगलीसारखी परिस्थिती उद्भवू शकेल. अशी कृती करणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी शोध घेऊन त्याला रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.nयाबाबत प्राप्त माहिती अशी की,nभगूर येथे राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने समाज माध्यमात अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी वरील मंदीरात श्रीराम लल्लांची मुर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या दिवशी इंस्टाग्राम अकाउंटवर हिंदू विरोधी पोस्ट टाकली. ती व्हायरल होताच भगूर परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. काही काळ गावात तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची खबर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याला प्राप्त होताच. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आणि सहकारी पोलीसांनी भगुर गावात धाव घेतली. सदर प्रकाराची माहिती घेतली. खात्री करून तेली गल्लीतील पाण्याच्या टाकी जवळ राहणाऱ्या समाज कंटकाचा शोध घेवुन त्याला ताब्यात घेतले. त्याला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आलाय.nया घटनेमुळे भगूर शहरातील मुख्य चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. अयोध्यातील राम मंदीरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा देश देशभरात आनंदात होत आहे. या आनंदावर विरजण घालण्याचे काम या समाज कंटकाने केले आहे. त्यामुळे भगुरातीलnवातावरण तापले होते. यापूर्वीही एका तरुणाने मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी देखील भगुरचे वातावरण बिघडले होते. त्या तरुणावरही कारवाई करण्यात आली होती. मात्र पुन्हा पुन्हा असे प्रकार होत असल्याने अशा समाजकंटकांवर वेळीच अंकुश लावण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *