July 13, 2026

भगूरच्या घटनेनंतर एसीपी बारी यांनी बैठकीत केल्या मौलिक सूचना.

0

मुस्लीम समाज बांधवांशी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संवाद.nnप्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- इंस्टाग्राम अकाउंटवर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात भगूरच्या मुस्लिम समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी नाशिकरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी उपयुक्त मार्गदर्शन उपस्थितांना केले. भगुर गावात शांतता नांदावी. जातीय सलोखा कायम रहावा. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अनेक मौलिक सूचना केल्या.nबुधवार दिनांक २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात भगूरच्या मुस्लिम बांधवांची एक बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी मुस्लिम बांधवांशी सुसंवाद साधला. त्यांच्या सूचना, समस्या, तक्रारी जाणून घेतल्या. तत्पूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी केलेल्या प्रास्ताविकात भगूर मध्ये घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर भगूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक फरीद शेख यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले बाहेरून येणारे लोक गावात दहशत निर्माण करतात. धर्माविषयी अपशब्द वापरतात. बेकायदेशीर, गैरकृत्य करतात. वातावरण दूषित करतात. त्याचा नाहक त्रास गावकऱ्यांना होतो. एकाने चूक केली तर इतरांना वेठीस धरणे योग्य नाही. असे म्हणने मांडले. भगूर मध्ये झालेल्या प्रकाराचा समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त केला. आणि भविष्यात अशी घटना होणार नाही, याची आम्ही दखल घेऊ अशी ग्वाही दिली. हिंदु-मुस्लिम धर्मात वितुष्ट निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. कुठलेही बेकायदेशीर चुकीचे व गैरवर्तन करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. गावात शांतता, कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. संयम बाळगला जाईल अशी ग्वाही मुस्लिम समाजाच्या वतीने दिली. यावेळी इतरांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.nत्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी मार्गदर्शन केले. सोमवारी घडलेल्या घटननेनंतर पोलीसांनी जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात करून सर्वांना संरक्षण दिले. त्याबाबत माहिती दिली. बाहेरून येऊन गावचे वातावरण दूषित करणाऱ्यांवर करडी नजर ठेवावी. त्यांना अटकाव करावा. आपल्या परिसरातील संवेदनशील ठिकानी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. सीसीटीव्हीचा बॅकअप महिना, दीड महिना सांभाळून ठेवावा. सीसीटीव्हीची देखभाल, दुरुस्ती व्यवस्थित करावी. सोशल मीडियाचा वापर स्वतः जपून करावा. इतरांनाही त्याबाबत सूचना द्याव्या. चांगल्या कामासाठी सोशल मीडियाचा वापर करावा. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. अज्ञान बालकांकडे मोबाईल देऊ नये. त्यावरून वादग्रस्त पोस्ट व्हायरल होणार नाही याची दक्षता घ्यावी. धार्मिक कार्यक्रमाला बाहेर गावावरून येणाऱ्यांची रजिस्टर मध्ये नोंद ठेवावी. परिसरातील भाडेकरूंची पोलिस ठाण्यात सविस्तर नोंद करावी. कुठलीही बेकायदेशीर घटना, कृत्य घडत असल्यास आपणास किंव्हा देवळालीच्या पोलिसांना त्वरित संपर्क साधावा. त्यांची मदत घ्यावी. कुणीही कायदा हातात घेऊ नये. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीतील मार्गदर्शनपर सूचना सर्व समाज बांधवांना शुक्रवारच्या नमाज नंतर द्यावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन केले. सोमवारच्या घडलेल्या घटनेनंतर मुस्लिम समाजाने ठेवलेल्या संयमाविषयी त्यांचे आभार मानून एसीपी बारी यांनी त्यांना धन्यवाद दिले. यावेळी झालेल्या बैठकीस भगूरचे माजी नगरसेवक फरीद शेख, मौलाना हाफिज इकबाल, मौलाना अश्फाक रजा, विविध धार्मिक स्थळांचे ट्रस्टी हाजी रशीद खान, युनूस नूर मोहम्मद, असलम शेख, लियाकत पटेल, समीर शेख चांद, सिद्दीक मुनीर खान आदिंसह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *