July 13, 2026

गणतंत्र दिवस राष्ट्रवादी भवन येथे उत्साहात साजरा

0

n

नाशिक (दि.२६ जानेवारी) – राष्ट्रवादी पक्षाने विकासाचा संकल्प स्वीकारल्यामुळे भाजपासोबत असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी भवन येथे ध्वजा वंदन त्यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, नाशिक लोकसभा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, प्रेरणा बलकवडे, योगिता आहेर, अंबादास खैरे, गौरव गोवर्धने, संजय खैरनार, नितीन चंद्रमोरे, ऋषिकेश पिंगळे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

n

        माजी आमदार जयवंत जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारत आज ७५ वा गणतंत्र दिवस साजरा करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने खूप विकास केला आहे. आज भारताची अर्थव्यववस्था जागतिक पातळीवरच्या पहिल्या तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. त्यातून सर्वसामान्य जनतेच्या राहणीमनात देखील सुधार होत आहे. सर्वाना घर मिळावे याकरिता पंतप्रधानासह राज्यातील नेते विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार झटत आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता राष्ट्रवादीने सत्तेत सहभागी होऊन विकासाचा संकल्प स्वीकारला असल्याचे माजी आमदार जयंत जाधव यांनी सांगितले. भारत हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालत असून संविधानाची प्रस्तावना “आम्ही भारताचे लोक” या वाक्याने सुरू होते. ही वाक्ये लोकशाहीला रेखांकित करतात. आणि याचीच  मूल्ये आत्मसाथ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर भारताचा ठसा उमटवत असल्याचे त्यांनी सांगितले.

n

यावेळी नाशिक लोकसभा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार योगेश निसाळ यांनी मानले. या प्रसंगी बाळासाहेब गिते, मकरंद सोमवंशी, शंकर मोकळ, जीवन रायते, प्रशांत वाघ, रवी हिरवे, विजय तुपलोंढे, चिन्मय गाढे, बाळासाहेब काठे, सुनिल अहिरे, योगेश दिवे, वजहत शेख, दिलीप दोंदे, ज्ञानेश्वर महाजन, रेहान शेख, सुरेखा निमसे, पुष्पा राठोड, रूपाली पठाडे, संगिता गांगुर्डे, संगिता चौधरी, वृषाली बच्छाव, पुष्पलता उदावंत, वर्षा लिंगायत, निर्मला सावंत, चैतन्य देशमुख, प्रथमेश पवार, स्वप्निल कासार, रवींद्र शिंदे, मोतिराम सोनवणे, छगन भंदुरे, गणेश वादाड, अश्विन कटारे, आकाश  घबडगाव, पुनित चौधरी, राधेश्याम पोळकर, कपिल काळे, संजय शेजवळ, ओमकर पैठणकर, वृषभ चंद्रमोरे, विश्वजित पाटील, प्रशांत गांगुर्डे, विशाल हिवाळे, सनिका गांगुर्डे, सोंजळ वाघ, शुभम गायकवाड, नितीन काळे, निलीमा काळे, पुष्पा वाघ, रामेश्वर साबळे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *