July 13, 2026

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतंर्गत दुग्धविकास प्रकल्पासाठी अर्थसहाय्य : प्रकल्प अधिकारी डॉ. बी. एम. पाटील

0

नाशिक, दिनांक: 2 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा):nकळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यक्षेत्रातील सटाणा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजने अंतर्गत संयुक्तदायित्व गटाच्या माध्यमातून पथदर्शी दुग्धविकास प्रकल्प राबवण्यासाठी अर्थसहाय्य करण्याच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. बी. एम. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.nnसटाणा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी संयुक्तदायित्व गटाच्या माध्यमातून पथदर्शी दुग्धविकास प्रकल्प राबवण्याकरिता अर्थसाह्य करणारी योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज 5 ते 20 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत शनिवार व रविवार तसेच शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, कळवण यांच्या कार्यक्षेत्रातील गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या कार्यालयात वाटप व स्वीकारण्यात येणार आहेत. मुदतीनंतर अर्जांचे वाटप व स्वीकार केला जाणार नाही, असे ही डॉ. पाटील यांनी कळविले आहे.nnही आहेत अर्जासह सादर करावयाची कागदपत्रे…n➡️ लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावाn➡️ जातीचा दाखलाn➡️ आधार कार्ड, रेशन कार्डn➡️ लाभार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुकची झेरॉक्सn➡️ अलीकडील एक वर्षाच्या आतील उत्पन्नाचा दाखला/ बी.पी.एल. दाखलाn➡️ अपंग, विधवा, परितक्त्या प्रमाणपत्र (असल्यास)n➡️ मतदान किंवा पॅनकार्डn➡️ दोन पासपोर्ट आकाराचे फोटोn➡️ यापूर्वी सदर योजनेचा लाभ या कार्यालयाकडून किंवा अन्य शासकीय विभागाकडून घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्रn➡️ ग्रामसभेचा ठराव गट नोंदणी प्रमाणपत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *