July 13, 2026

प्राथमिक विद्यामंदिर भगुर शाळेत माता पालक मेळावा संपन्न

0

भगूर, l प्रतिनिधी :- विद्यामंदिर शिक्षण समिती संचलित प्राथमिक विद्यामंदिर भगूर शाळेत माता पालक मेळावा तसेच हळदी कुंकू कार्यक्रम मंगळवार दि. ६ रोजी दुपारी उत्साहात पार पडला.nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती सदस्या प्रेरणाताई बलकवडे तर प्रमुख अतिथी म्हणुन देवळाली महिला जनकल्यानी फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती नाजनीन तारवाला व मंडळाच्या सदस्या, त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका वंदना आडके, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रमोद रहाणे, उपाध्यक्ष रुपाली उचाडे, गायत्री कुलकर्णी उपस्थित होत्या. श्री सरस्वती माता प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी देवळाली महिला जनकल्यानी फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तर माता पालकांना हळदी कुंकू, भेटवस्तू व साडी वाटप करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रेरणाताई बलकवडे म्हणाल्या कि मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका. त्यांना संस्कारक्षम बनवा. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी उच्चशिक्षित करा. असा मौलिक संदेश दिला. कार्यक्रमास देवळाली महिला फाउंडेशनच्या सदस्या सीमा गुप्ता, नीलम रावल, ज्योती प्रधान, वैशाली चौधरी, सुजाण लाल, भाग्यश्री पवार, सावित्री मांडवे आदींसह माता पालक उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना आडके तर पाहुण्यांचा परिचय प्रमोद रहाणे, सूत्रसंचालन विजया चतुर, तर आभार प्रदर्शन महेंद्र महाजन यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *