July 14, 2026

कायद्याच्या चौकटीत सण, उत्सव साजरे करा- पोलीस उपायुक्त मोनिका राऊत

0

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- आगामी शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात परंतु नियम, कायद्याचे पालन करून कायद्याच्या चौकटीत साजरा करा असे आवाहन परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केले.nदेवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक मंगळवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आदींसह विविध सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी केले. त्यानंतर वैभव पाळदे, प्रमोद मोजाड, प्रदीप गुरव, यांनी चर्चेत सहभागी होऊन विविध सूचना मांडल्या. त्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्या म्हणाल्या की शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांच्या रीतसर परवानगी मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घ्यावी. सर्व कार्यक्रमांची सविस्तर स्वरूपाची माहिती, स्वयंसेवकांची नावे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याला द्यावी. कुणाच्या धार्मिक, जातीय भावना दुखावल्या जाणार नाही अशा स्वरूपाच्या आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांवरून प्रसारित होणार नाही. अफवा पसरणार नाहीत याची दक्षता घ्यावी. खात्री केल्याशिवाय कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषणाची मर्यादा पाळावी. मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणा दिल्या जाणार नाहीत. उत्सवाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. सोहोळ्यात सहभागी महिला आणि तरुणींच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. त्यांची छेडछाड होणार नाही. चैन स्नेचींग होणार नाही याविषयी सावधगिरी बाळगावी. नियम, कायद्याचे भंग करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये. असेही आवाहन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केले. सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी मिरवणुकीतील ध्वजा विषयी सूचना केल्या. ध्वज जास्त उंच राहणार नाही. त्याच्यामुळे कोणालाही इजा होणार नाही. कुठलीही दुर्घटना घडणार नाही. याविषयी दक्षता घेण्याचे आवाहन केले. मंडळांनी स्वयंसेवकांची यादी तयार करावी. ती पोलिसांना पुरवावी. संपूर्ण मिरवणुकीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे. मिरवणुकी दरम्यान स्वतःचे स्वयंसेवक तैनात ठेवावे अश्या स्वरूपाच्या सूचना केल्या. यावेळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती देवळालीचे अध्यक्ष अजिंक्य गोडसे, संदिप शिंदे, पोपटराव जाधव, बाळासाहेब गोडसे, प्रशांत कोकने, नीलेश जाधव, महेश हरक, राजेश धूर्जड, राहूल धूर्जड, नितीन जाधव, रामा रोकडे, शिवा शिंदे, कुणाल रोकडे, सुशांत गायकवाड, राजेश गायकवाड, ऋषिकेश गोडसे, साहेबराव चौधरी, मुजमिल खान, खंडेराव मेढे, त्रंबक शिंदे, संदिप रोकडे, सुनिल मोरे, फरीद शेख, भारत वाघमारे, विक्रम पवार, किरण मोजाड, राहुल गीते, शेखर गोडसे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. शांतता समितीची बैठक यशस्वीतेसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे श्याम कोटमे, राजेंद्र मोजाड, पंडित आहेर आणि इतर अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *