पळसेत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
प्रमोद रहाणे l नाशिकरोड:-nग्रामाभिमान मंच, पळसे यांच्या वतीने कै. भास्करराव ढेरींगे वक्तृत्व चषक ही नाशिक जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा- २०२४ आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी, २०२४ रोजी संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूल येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. तरी, श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामाभिमान मंचचे अध्यक्ष प्रमोद गायधनी यांनी केले.nया स्पर्धेला पळसे पंचक्रोशीसह नाशिक तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातून तसेच सिन्नर, कळवण, निफाड, संगमनेर या तालुक्यांतून भरघोस प्रतिसाद लाभला आहे. तरी ही स्पर्धा म्हणजे स्पर्धकांसह श्रोत्यांनाही विचारांची मेजवानी ठरेल असा आशावाद स्पर्धा समन्वयक समाधान गायधनी यांनी व्यक्त केला.nप्रथम विजेत्यास अनिल भास्कर ढेरिंगे यांच्याकडून रूपये २१०० व चषक, द्वितीय विजेत्यास सुहासभाऊ खाडे यांच्याकडून रूपये १५०० व चषक, तृतीय विजेत्यास संदिप शिवाजी गायखे यांच्याकडून रुपये ११०० व चषक तसेच कवी रविंद्र मालुंजकर सर यांच्याकडून ७ स्पर्धकांना उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह मिळणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळणार आहे.nवक्तृत्व स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे:n१) भारतीय लोकशाहीचा पाया: छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य,n२) जिजाऊ, ताराराणी, अहिल्या, सावित्री: महाराष्ट्राची स्त्रीशक्तीपीठेn३) छत्रपती संभाजी महाराज : शुर आबांचा शुर छावाn४) २१ व्या शतकातील शिक्षण कसे असावे?n५)नको नुसतीच कारखानदारी, पर्यावरण जपणे खरी जबाबदारीn६) पक्षापेक्षा देश महत्वाचा, नेत्यापेक्षा संविधान महत्त्वाचेn७) संत आईसाहेब महाराज: नाशिकच्या वारकरी संप्रदायाचे वैभवnअसे एकाहून एक दर्जेदार विषय या वक्तृत्व स्पर्धेत स्पर्धकांना देण्यात आले आहेत.