नाशिकच्या उड्डाण पुलावर दोन ट्रकचा अपघात.
ट्रक चालकाला झोपेची डुलकी लागल्याने झाली धडक.nअपघातग्रस्त ट्रक चढले रस्ता दुभाजकावर.nnनाशिक l प्रतिनिधी :- नाशिक कडून ओझरच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रक मध्ये अपघात झाल्याची घटना शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई नाका परिसरातील उड्डाणपुलावर घडली.nसदर अपघातात दोन ट्रक उड्डाण पुलावरून ओझरच्या दिशेने जात होते. त्यातील पुढील आयशर ट्रक क्रमांक एम एच ४८ बी एम ६९० हा ओझरला जात होता तर त्याच्या मागून मुंबईकडून कानपूर ला जाणारा ट्रक क्रमांक यूपी 78 सिटी 9308 हा माल ट्रक जात होता. यावेळी मागून जाणाऱ्या मालट्रक चालकाला सकाळच्या साखर झोपेची डूलकी लागल्याने ट्रक पुढे जाणाऱ्या आयशर ट्रकवर जाऊन धडकला. त्यामुळे आयशर दुभाजकावर जाऊन आदळला. तसेच मालवाहू ट्रक देखील दुभाजकाला जाऊन धडकला. या अपघातात दोन्ही ट्रकचे नुकसान झाले आहे. उड्डाण पुलावर भर रस्त्यात अपघात झाल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.