July 14, 2026

चोरीस गेलेल्या मोबाईल चोरांना युनिट 1 च्या पथकाने पकडले रंगेहात

0

 nnमुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 53/2024 भादवी कलम 392,34 प्रमाणे दिनांक 12/2/2025 रोजी गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना दिनांक 15/2/2024 रोजी पोलीस हवालदार महेश साळुंके यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की नाशिकरॊड येथील वीर सावरकर उड्डाणं पुला खाली दोन इसम चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी एका काळ्या रंगाच्या मोटार सायकल वर येणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना देताच शिंदे यांनी विष्णू उगले,देविदास ठाकरे, महेश साळुंखे,मिलिंदसिंग परदेशीं, राहुल पालखेडे,नितीन जगताप, अप्पा पाणवळ,मुख्तर शेख अशांनी सापळा रचून दोन इसमांना पकडून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अजय राजेंद्र गरुड वय वर्ष 25 राहणार एचडी एफ सी एटीएम शेजारी माळेगाव सिन्नर,विक्रम त्रंबक लहाने वय वर्ष 23 राहणार सोनगिरी जाखोरी रोड सिन्नर नाशिक असे त्यांचे नाव असून त्यांनी दिलेल्या कबुली वरून जबरी चोरीस गेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली कें टी एम कंपनीची वापरलेली ड्युक मोटार सायकल असा एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ह्या गुन्ह्याचा तपास मुंबई नाका पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *