July 14, 2026

सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा

0

सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने मनपा व खाजगी शाळांमधील विद्यार्थीसाठी समूहनृत्य स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम सपन्नnnसामाजिक सलोखा आणि विविध जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन गेल्या सात वर्षापासून सातपूर शहरात शिवजन्मोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समिती मार्फत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील समितीच्या वतीने घेण्यात येत असतात त्याच माध्यमातून शिवजन्म महोत्सव समितीच्या वतीने दिनांक 16 फेब्रुवारी रोजी भव्य नृत्य स्पर्धा व स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धेकांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नाशिक मनपा शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील, नाशिक मनपा अधिकारी मयूर पाटील, समिती अध्यक्ष अनिल गडाख, कार्याद्यक्षा फरीदा सलीम शेख, उपाध्यक्ष पोपट जेजुरकर, सरचिटणीस दीपक मौले, चिटणीस भगवान काकड, सचिव किरण डोखे, प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांच्या उपस्तिथीत महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.nया स्पर्धेत सातपूर परिसरातील विविध शाळेच्या विध्यार्थीसाठी निबंध लेखन इयत्ता 5 वी ते 7 वी लहान गट व 8 वी ते 10 मोठा गट व पहिली ते 4 थी अशी प्रत्येक शाळेत ही स्पर्धा घेण्यात आली होति याच अनुषंगाने विद्यार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.nदरम्यान या प्रसंगी रवी देवरे, मुन्ना तुपे, सचिन गांगुर्डे, विकास काळे, बाळा आवळे, राजेश खताळे सर्व शाळेतील मुख्याध्यापक, पालक व तसेच सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.nया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेश खताळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *