विक्रोळी स्थानकाची भुसावळ मंडळाच्या निरीक्षण समितीकडून पाहणी
देवळाली कॅम्प :- विशेष प्रतिनिधीnभारतीय मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांचा कायापालट करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना सुरु करण्यात आली असून त्यामध्ये मुंबई विभागातील १२ स्थानकांपैकी विक्रोळी येथे सुरु असलेल्या कामाची पाहणी भुसावळ मंडळाने नेमलेल्या निरीक्षण समिती मार्फत करण्यात आली.n’अमृत भारत स्थानक ’ योजनेंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १५ स्थानकांचे विकास काम रेल्वेने हाती घेतले आहे. यापैकी परळ, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भायखळा रेल्वे स्थानकांचे पुर्निविकास काम सुरु झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक प्रवाशांचा राबता असलेल्या विक्रोळी स्थानकावरून मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या सोयिसाठी १९.६० कोटी रु.खर्चाचे काम सुरु आहे. त्यातील पहिल्या टप्यातच स्थानकाचा पुर्नविकासचे काम रेल्वेने हाती घेण्यात आले असून या योजनेमध्ये आराखड्यानुसार स्टेशनवरील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रवाशांचा प्रवेश दोन्ही बाजूने सुकर करणे, यामध्ये अंध व दिव्यांग बांधवांसाठी विशेष सोयी, नव्याने स्वच्छतागृहे उभारणी, आवश्यकतेनुसार लिफ्ट/एस्कलेटर,पार्किंग व स्वच्छता व्यवस्था,स्थानकाच्या सौंदर्यामध्ये भर घालणारी रचना, सर्व कार्यालये एकाच ठिकाणी नवी इमारत उभारणे अशी कामे प्रगतीपथावर असून या कामांचे निरीक्षण व पाहणी करणेकामी भुसावळ मंडळाच्या वतीने अशासकीय सदस्य प्रशांत धिवंदे,अंबादास शिंदे, भैय्यासाहेब कटारे यांचेसह नाशिकरोड येथील नाशिकरोड स्टेशन उपप्रबंधक अमोल ठाकूर आदींच्या पथकाने पाहणी केली. यावेळी डीसीएम (कोचिंग ) अमिषा, स्टेशन प्रबंधक मधू कौंजर,सीसीआय पवन कुमार यांनी पथकाचे स्वागत करत स्थानकात नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती देत प्रत्यक्ष सुरु असलेल्या कामाची पाहणी करत विविध सूचनाही केल्या. त्यानंतर समितीने युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भेट दिली. यावेळी वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी समितीस ‘धरोहर दीर्घा’ या रेल्वेचा इतिहास सांगणाऱ्या संग्रहालयात भेट देत संग्रहालयाचे व्यवस्थापक स्वप्नील जाधव यांनी टर्मिनल उभारणी मागचा इतिहास व रेल्वेच्या दोनशे वर्षांपूर्वी वापरात असलेल्या विविध उपकरणे व साहित्याविषयी माहिती दिली.