नागरिकांच्या सतर्कतेमुळे किराणा दुकान फोडून चोरी करणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात
परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे किराणा दुकान फोडून चोरी करणारे चोरटे नागड दरवाजा परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. सततच्या चोऱ्यामुळे नागरीक देखील धास्तावले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी किराणा दुकान फोडले परंतु आवाजाने काही नागरिकांना जाग आली.चोरट्यांना नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन देखील केले. चोरट्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे टामी, चाकू, व मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली.येवला शहर पोलिसात याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.शहर व परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने कॉलनी परिसरात नागरिकांनी स्वतः ग्रस्त सुरू केली आहे.शहर परिसर आणि लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस संख्या अतिशय तोडकी असल्याने शहरवासियांनी देखील सुरक्षेच्या दृष्टीने सजग राहणे गरजेचे आहे तसेच सुरक्षेसाठी दुकानांवर सीसीटीव्ही बसवणे गरजेचे असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आहे.