July 13, 2026

अमूल श्रीखंडत वाढली मानवी नखे नाशिक येथील प्रकार

0

अमूल श्रीखंड खाताय सावधान अमूल श्रीखंडात अक्षरशा बोटाची नख कापलेली आढळून आली आहेत.. होय आपण ऐकलं ते खरं आहे हा नाशिक मध्ये घडलेला प्रकार आहे. नाशिक मधील के मोहनलाल सुपर बाजार नाशकातील सेवा कुंज पंचवटी या भागातील होलसेल दुकान असून याच दुकानातून घेतलेले अमूर अमूल श्रीखंडाच्या पावशेरच्या डब्यात अक्षरशः मानवी नख निघाले आहेत. नाशकातील ग्राहक प्रवीण शेलार यांच्या डब्यात ही नखे आढळून आली आहेत. श्रीखंडाबरोबर आपण काजू बदाम खातात आता नखे ही खा असं कदाचित अमूल कंपनीचा मत असेल यात शंकाच नाही. यापूर्वीही एका कंपनीच्या आईस्क्रीमच्या डब्यात मानवी बोटाचा तुकडा सापडला होता. सदर अमोल कंपनीचा डिस्ट्रीब्यूटर कारवा इंटरप्राईजेस रविवार कारंजा, चांदीच्या गणपती मंदिराजवळ असा डिस्ट्रीब्यूटरचा पत्ता असून याच डिस्ट्रीब्यूटर कडून मोहनलाल सुपर मार्केट या विक्रेत्याने प्रोडक्ट खरेदी केले होते. ही बाब आमच्या प्रतिनिधींच्या लक्षात आल्यानंतर अमूल कंपनीचे सेल्स एक्झिक्यूटिव्ह जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र जोशी यांनीं प्रतिसादच दिला नाही. अशा बेजबाबदार खाद्य कंपन्यांना सरकारने कारवाई करून त्यांच्या प्रॉडक्ट लासल लावले पाहिजे ते बंद केले पाहिजे म्हणजे सामान्य नागरिकांचा जीव वाचेल त्यांना कुठल्याही आरोग्यास धोका होणार नाही. सदर प्रॉडक्टची चौकशी नाशिक फूड अँड ड्र्क्सने केली आहे का याचाही तपास करणे गरजेचे आहे. बाहेरून येणाऱ्या प्रोडक्सची तपासणी ही फूड अँड ड्रसच्या वतीने केली पाहिजे अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे. अमूल ब्रांडवर कारवाई होईल का अशी अपेक्षा आता जनसामान्य करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *