July 13, 2026

विद्यार्थ्यांना परीक्षेचा आत्मविश्वास : प्राचार्य राम कुलकर्णी

0

इयत्ता १० वी आणि १२ वीची बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘शैक्षणिक शिबिराचे’ मुख्य स्वरूप आणि फायदे गेल्या २५ वर्षांपासून अविरतपणे श्री पद्मतारा सामाजिक शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या वतीने आयोजन केले जाते. श्री पद्मतारा सामाजिक शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था आणि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक जेलरोड शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पूर्व शैक्षणिक शिबिराचे आयोजन करण्यात आले.nयावेळी गोखले एज्युकेशन सोसायटी विभागीय सचिव डॉक्टर राम कुलकर्णी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. तर डॉक्टर उदय शेवतेकर सर, व्यापारी बँकेचे अध्यक्ष अशोक चोरडिया, व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक दत्ताजी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री पद्मतारा सामाजिक शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था तथा श्रीकांत क्लासेसचे संचालक प्राध्यापक अविनाश वाघ सर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्राचार्य आनंद खरात सर, ज्येष्ठ पत्रकार सतिश रूपवते, टेक्निकल सायन्स अकॅडमीचे संचालक राहुल शिंदे, आकाश निमसे, आरंभ महाविद्यालयाचे विलास सानप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कुमारी श्रद्धा माळुंजकर हिने जर्मन भाषेत तिसऱ्या पायरीत राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवल्याप्रकरणी तिचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यापारी बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी, डॉक्टर अश्विनी दापोरकर, सरीमन पाचपांडे मॅडम, राजू तनपुरे, अँड. धीरज बर्जे, महेश डोईफोडे, योगेश ताजनपुरे, शरद चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.nमंगेश फडोळ यांनी सूत्रसंचलन केले तर प्रशांत मलठणकर सर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *