July 13, 2026

जनआक्रोश महामोर्चाची तयारी पूर्ण चार तारखेला महामोर्चा धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर

0

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना महामोर्चाची धास्ती. रविवारच्या पत्रकार परिषदेत देखील नाशिकचे पालकमंत्री नसलेल्या गिरीश महाजनांना पत्रकारांनी विचारले नाही प्रश्न . तमाम आंबेडकर अनुयायांचा नाशिकमध्ये गिरीश महाजन विरोधात महामोर्चा . प्रजासत्ताकीय भाषणात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव व संविधान शब्द गिरीश महाजनाने टाळा म्हणून नाशिकमध्ये महामोर्चाचे आयोजन.नाशिक मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2026 रोजी नाशिकचे पालकमंत्री नसलेले गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री नाशिक यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्याचे ध्वजारोहण केले पोलीस परेड ग्राउंडवर नाशिक मधल्या सर्वच शासकीय बलांनी ध्वजाला मानवंदना दिली नंतर नाशिकचे पालकमंत्री नसलेले कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आपले प्रजासत्ता दिनानिमित्त भाषण केले भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरुवात करीत भारत माता की जय असे म्हणून भाषण केले मात्र ज्यांच्यामुळे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन केला जातो असे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्याचं कुंभमेळा मंत्री नाशिकचे पालकमंत्री नसलेले गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक टाळ या कार्यक्रमाकरिता वन खात्यातील अधिकारी माधवी जाधव यांनी गिरीश महाजन यांनी भाषणात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का घेतला नाही अशी वर्दीवरच विचारणा केली. त्या कार्यक्रमात माधवी जाधव यांनी अधिकाऱ्यांसमोर आक्रोश करीत माझी नोकरी गेली तरी चालेल मला सस्पेंड केले तरी चालेल मी जुने भांड्याचे काम करील मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव पुसू देणार नाही आणि तमाम यंत्रणेला माधुरी जाधव व दर्शना सौपुरे यांनी जाब विचारला वेळीच पोलीस दाखल झाले माधवी जाधव व दर्शना सौपुरे यांची समजूत काढली मात्र माधवी जाधव या ऐकण्यास तयार नव्हत्या कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव गिरीश महाजन यांनी त्या कार्यक्रमात घेतल नाही. प्रकरण वाढलं गिरीश महाजन यांच्या राजीनामाची मागणी सुरू झाली गिरीश महाजन हटाव मोहीम सुरू झाली. गिरीश महाजन यांनी दोन वेळा माफी न मागता प्रसार माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केली. जाणीवपूर्वक केलेली चूक या चुकीला फक्त माफी हा शब्दच समर्पक आहे दिलगिरी नाही म्हणून समस्त आंबेडकरी जनता पेटून उठली आणि याचे पडसाद उद्याच्या आंदोलनात उमटणार आहे. 4 फेब्रुवारी 2025 रोजी जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन समस्त आंबेडकरी अनुयायांनी केले आहे या महामोर्चात लाखोच्या संख्येने उपस्थित रहा असे आव्हान देखील युवा आयोजकांकडून करण्यात आले आहेत.नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावात शहरातील प्रत्येक वस्तीत आंबेडकरी अनुयायी तेथे जाऊन महामोर्चा कशासाठी आहे याचे प्रबोधन करीत आहेत. महामोर्चा यशस्वी करण्यासाठी जीवाचे रान व रात्रीचा दिवस करून आंबेडकरी अनुयायी मेहनत करीत आहेत . त्यांच्या या मेहनतीला क्रांतिकारी जय भिम. जनआक्रोश महामोर्चा यशस्वी करण्यासाठी युवा आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते यांनी प्रथमता हुतात्मा स्मारक सीबीएस येथे बैठक घेतली . त्यानंतर विभाग वार समित्या तयार करून नाशिक रोड पंचवटी सातपूर सिडको गंगापूर नवीन सिडको मध्य नाशिक देवळाली कॅम्प तसेच नाशिक जिल्ह्यातले 15 तालुके या विभागात मोर्चा का व कशासाठी आहे हे समजून सांगत बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी महामोर्चा कशासाठी आहे याचे आव्हान केले. आंबेडकर अनुयायांनी महामोर्चा यशस्वीतेसाठी रात्रीचा दिवस व जीवाचे रान केले आहे. या मोर्चाची धास्ती प्रशासनाने घेतली आहे . आंबेडकरी जनता मनुवाद्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हेच या महामोर्चातून सिद्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *