July 13, 2026

सातपूरमध्ये नाशिक महानगरपालिकेचा पाणीपुरवठा पाईप फुटला; मोठी गळती, नागरिक त्रस्त

0

सातपूरमध्ये नाशिक महानगरपालिकेचा पाणीपुरवठा पाईप फुटला; मोठी गळती, नागरिक त्रस्त

nनाशिक लोकल : शिवाजी आढांगळे | सातपूर nnसातपूर परिसरात यांच्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य लाईनचा पाईप फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू आहे. रस्त्यावरून सतत पाणी वाहत असल्याने नागरिकांना गैरसोय होत असून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.nnघटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाला तातडीने कळवले. मात्र, बराच वेळ उलटूनही दुरुस्ती पथक घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही नागरिकांनी महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन सिक्युरिटीला आवाज दिला असता दरवाजा उघडण्यात आला नाही, अशीही तक्रार समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.nnपाईप फुटल्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच काही भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शहरात अशा प्रकारे पाण्याची नासाडी होणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.nnस्थानिक नागरिकांनी तातडीने दुरुस्ती करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महानगरपालिकेने याकडे त्वरित लक्ष देऊन गळती थांबवावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *