August 6, 2026

अनैतिक व्यापाराची ती जागा खुली करण्यात आली.

0

नाशिक लोकल सतिश रुपवते nनाशिक शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना चर्चेत कसे राहायचे हे माहिती होतं. सोशल मीडियाची क्रेझ असलेले आयुक्त पांडे यांनी नाशिक मध्ये असतांना वेग वेगळे निर्णय घेतले. एका सोशल व्यक्तीच्या अर्जाला बळी पडून त्यांनी मोठा निर्णय घेतला आणि शेकडो स्त्रियांवर आधारित कुटुंब उध्वस्त झाले. भद्रकाली येथील अनैतिक व्यापार पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला होता. भद्रकालीतील अनैतिक व्यापार वर्षानुवर्षांपासून चालू होता तो कधीच खंडित झालेला नव्हता मात्र तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी तो खंडित करून नाशिककरांची वाह वाह मिळवली. मात्र त्याच कुंटण खाण्याची जागा नाशिक पोलीस आयुक्त जयवंत नाईकनवरे यांनी खुली केली आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंध नियम सन 1956 ( 1956 चा 104) च्या कलम 18 व 20 च्या प्रयोजनासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे अधिकार प्रदान करण्यात आले होते. नाशिक शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अनैतिक व्यापार संबंधी गुन्ह्यांना पायबंद घालने आवश्यक असल्याने व नागरिकांवर त्यांच्या कुटुंबांवर अनैतिक व्यवसायामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर अडचणी निर्माण होऊ नये या दृष्टीने व्यापार प्रतिबंध अधिनियम सन 1956 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संदर्भीय आदेशांवर शासनाने पोलीस आयुक्तांना अधिकार प्रदान केले होते. पोलीस आयुक्तालयातील भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत घर क्रमांक 113 सिटी सर्वे नंबर 124 पिंपळ चौक ठाकरे गल्ली भद्रकाली नाशिक येथे सुरू असलेल्या वर भद्रकाली पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी कारवाई करून पाच गुन्हे दाखल केले होते. या ठिकाणचा कुंटणखाना एक वर्षासाठी सीलबंद करण्याचे आदेश पारित करण्यात आले होते. त्या आदेशाला सहा डिसेंबर 2022 रोजी एक वर्ष पूर्ण झाले. 30 नोव्हेंबर 2021 रोजी एका वर्षाकरिता सीलबंद करण्यात आल्याचा आदेश करण्यात आला होता. मात्र ८डिसेंबर २०२२ पासून प्रभावी करण्यात येत असून अनैतिक व्यापार प्रतिबंधक नियम सन १९५६ च्या कलम १८ कक्षेत सदरची जागा कायदेशीर रित्या खुली करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सदर आदेशाची अंमलबजावणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक शहर यांनी केले आहे.n ़nचौकट nसदर आदेशाच्या आधारे नमुद प्रकरणातील कोणत्याही पक्षकारास नमुद जागेचा मालकी हक्क सांगता येणार नाही. मालकी हक्काबाबत चालू असलेले न्यायालयीन / प्रशासकीय दाव्यांच्या अधीन राहून सदर आदेश पारीत करण्यात आला आहे. सदर जागेच्या मालकी हक्क संबंधाने कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणान्या इसमांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.nअनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ मधील कलम १९ प्रमाणे संबधीत दंडाधिकान्यासमोर अर्ज करू शकतात व त्यांचे वास्तव्याबाबत संबंधित न्यायालयास विनंती करू शकतात.nपोलीस आयुक्त, नाशिक शहर तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी, यांना प्राप्त अधिकारान्वयेअनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम १८ अन्वये नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रासाठी अतिरिक्तः जिल्हादंडाधिकारी म्हणून प्राप्त अधिकाराचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *